Yash : 'रामायण'च्या सेटवरून यशचा पहिला लूक समोर, पाहायला मिळणार जबरदस्त ॲक्शन

Yash Ramayana Look : 'रामायण' चित्रपटातील यशचा पहिला लूक समोर आला आहे. या लूकची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे.
Yash Ramayana Look
YashSAAM TV
Published On

चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या आणि बहुप्रतीक्षित प्रोजेक्टपैकी एक 'रामायण' (Ramayana ) आहे. या चित्रपटात ॲक्शन, मायथोलॉजी आणि भव्यतेचा अफलातून संगम पाहायला मिळणार आहे. या भव्य सिनेमात रॉकिंग स्टार यश (Yash ) 'रावण'च्या भूमिकेत झळकणार असून त्यांचा पहिला लूक सध्या समोर आला आहे. 'रामायण' चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा आणि दिग्दर्शन नितेश तिवारी करत आहेत.

सुपरस्टार यश 'रामायण' सिनेमात केवळ मुख्य भूमिकेत नाही. तर ते को-प्रोड्यूसर देखील आहे. त्यांची निर्मितीसंस्था Monster Mind Creations आणि नमित मल्होत्रा यांची Prime Focus Studios मिळून हा चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. यश सध्या या भव्य सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हॉलिवूडचे दिग्गज ॲक्शन डायरेक्टर गाई नॉरिस यांच्यासोबत काम करत आहेत. गाई नॉरिस हे Mad Max: Fury Road आणि The Suicide Squad यांसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांसाठी प्रसिद्ध आहेत.

गाई नॉरिस आता 'रामायण'साठी उच्चस्तरीय ॲक्शन सीन डिझाईन करत आहेत. सेटवरून नुकत्याच समोर आलेल्या फोटोंमध्ये यश अतिशय फिट आणि युद्धासाठी सज्ज अशा लूकमध्ये दिसत आहेत. त्यांचा हा ट्रान्सफॉर्मेशन एक वेगळाच रावण समोर आणतो. असा रावण जो ताकद, करिष्मा आणि आधुनिकतेचे प्रतीक आहे. या सिनेमाचे शूटिंग तीन भागांमध्ये होणार असून पहिला भाग दिवाळी 2026मध्ये प्रदर्शित होईल, दुसरा भाग दिवाळी 2027 मध्ये रिलीज होणार आहे.

यश पहिल्या भागासाठी सुमारे 60 ते 70 दिवसांचे शूटिंग करणार आहे. 'रामायण' ही एक ऐतिहासिक कथा असून ती जागतिक स्तरावर पोहचवण्याचा उद्देश या प्रोजेक्टमागे आहे. या सिनेमात रणबीर कपूर आणि यश प्रमुख भूमिकेत आहेत.

Yash Ramayana Look
Rono Mukherjee : राणी मुखर्जी अन् काजोलवर कोसळला दुःखाचा डोंगर, रोनो मुखर्जी यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com