Delhi: सोनू सूद 'देश के मेंटर्स'चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर
Delhi: सोनू सूद 'देश के मेंटर्स'चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडरTwitter/@ANI

Delhi: सोनू सूद 'देश के मेंटर्स'चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज शुक्रवारी घोषणा केली की, अभिनेता सोनू सूद हा दिल्ली सरकारच्या ' देश के मेंटर्स ' कार्यक्रमाचा ब्रँड अॅम्बेसेडर असेल.

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी घोषणा केली की अभिनेता सोनू सूद हा दिल्ली सरकारच्या ' देश के मेंटर्स ' कार्यक्रमाचा ब्रँड अॅम्बेसेडर असेल. हा कार्यक्रम लवकरच सुरु होणार आहे.

अभिनेता सह संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना केजरीवाल म्हणाले, " सोनू सूद ने आमच्या कार्यक्रमाच्या 'ब्रॅंड अँबेसिडर होण्यास होकार दिला आहे. देश के मेंटर्स हा कार्यक्रम लवकरच सुरू करण्यात येईल.' तसेच केजरीवाल पुढे म्हणाले, " सोनू सूदने होकार दिल्यामुळे
आम्हाला आनंद होत आहे , ज्याने देशभरातील लाखो तरुणांना देशासाठी निस्वार्थ सेवेने प्रेरित केले आहे."

देश के मेंटर्स कार्यक्रम बद्दल बोलताना केजरीवाल म्हणाले, "आम्ही सर्वांनी चर्चा केली की, तो हे सर्व काम कसे करणार आहे. तसेच आम्ही त्याला दिल्ली सरकारकडून करण्यात येणाऱ्या चांगलय कामाविषयी सांगितले.

तसेच, आम्ही सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांविषयी चर्चा केली, बहुतेक मुले गरीब आहेत, कोणाला गायक बनायचे आहे किंवा काहीतरी बनण्याची इच्छा आहे. पण कुठे जायचे हे त्यांना माहित नाही. त्यासाठी आम्हाला काही लोकांनी पुढे यावे आणि अशा मुलांना मार्गदर्शन करावे अशी आमची इच्छा आहे. "

केजरीवाल पुढे म्हणाले, "आम्ही दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये परिवर्तन करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आता आम्हाला शिक्षणाला लोकक्रांती बनवायची आहे. जेव्हा देशभरातील तरुण लोक आमच्या शिक्षण क्रांतीमध्ये सामील होतील, तेव्हा भारताला जागतिक नेता Global Leader बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. "

Delhi: सोनू सूद 'देश के मेंटर्स'चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर
...अखेर 15% शाळेची शुल्क कमी बाबतच्या शासन निर्णयाला स्थगिती

सोनू सूद करणार राजकारणात प्रवेश?;

सोनू सूद आणि त्यांच्या भेटीवर आणि अभिनेत्याच्या राजकारणात येण्याच्या प्रश्नावर केजरीवाल म्हणाले, 'आमच्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही.' यावेळी मेंटर कार्यक्रमाचा ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून सोनूची निवड करण्यात आली. त्यामुळे सोनू आता समाजसेवेसाठी कोणती कामे करेल हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com