
पवन सिंहचं स्टेजवरच अभिनेत्री अंजली राघवशी गैरवर्तन
या प्रकारानंतर मोठा वाद उफाळला, सोशल मीडियावर ट्रोलिंग
पवन सिंहनं अखेर मागितली माफी
अंजली राघवकडूनही माफीचा स्वीकार
भोजपुरी इंडस्ट्रीचा अभिनेता पवन सिंह यानं माफी मागून वादावर पडदा टाकला आहे. हरियाणवी अभिनेत्री अंजली राघव हिच्याशी एका इव्हेंटमध्ये मंचावरच गैरवर्तन केल्यानंतर मोठा वाद उफाळला होता. सोशल मीडियावरही पवन ट्रोल झाला होता. अंजलीनं देखील व्हिडिओ करून पवन सिंहवर नाराजी व्यक्त केली होती. पण आता हा वाद निवळला आहे.
पवन सिंह यानं केलेल्या गैरवर्तनानंतर अंजली राघव हिच्यासोबत जे मतभेद झाले होते, ते संपुष्टात आले आहेत. व्यासपीठावरच कमरेला स्पर्श केल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पवन यानं माफी मागून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. अभिनेत्रीनं व्यथित होऊन ही इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण आता त्यानं स्वतःच माफी मागितली आहे. त्यावर अंजलीने देखील प्रतिक्रिया दिली आहे.
अंजली राघव हिनं पवन सिंहवर नाराजी व्यक्त केली होती. भोजपुरी इंडस्ट्री सोडणार आहे, असं ती म्हणाली होती. तिनं याचा व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केला होता. तो व्हिडिओ पवननं बघितल्यानंतर दुःख व्यक्त करत माफी मागितली. अंजलीनंही त्याला माफ केलंय.
पवन सिंहनं मागितलेली माफी स्वीकारून अंजलीनेही हा वाद संपल्याचे सांगितले. अंजलीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर पवन सिंहचा माफीनामा पोस्ट केला आहे. पवन सिंह यानं केलेल्या चुकीबद्दल माफी मागितली आहे. तो माझ्यापेक्षा मोठा आहे. वरिष्ठ अभिनेता आहे. त्याला माफ केलं आहे. हा विषय आता पुढे न्यायचा नाही. जय श्री राम!, असं तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पवन सिंहनं सोशल मीडिया हँडलवर स्टोरी ठेवत माफी मागितली. अंजली, तुम्ही केलेला व्हिडिओ व्यग्र वेळापत्रकामुळं बघू शकलो नाही. पण तुम्ही जे काही सांगितलं त्याची माहिती मला मिळाली. मला खूप वाईट वाटलं. तुझ्याबद्दलच्या माझ्या भावना वाईट नव्हत्या. कारण आपण कलाकार आहोत. तरीही तुम्हाला माझ्या वर्तनाने त्रास झाला असेल तर त्यासाठी मी माफी मागतो, असं पवन सिंह म्हणाला.
एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये हा प्रकार घडला. अंजली राघव आणि पवन सिंह हे दोघे व्यासपीठावर होते. पवन सिंह यानं अंजलीच्या कमरेला स्पर्श केला. त्यानंतर मोठा वाद उफाळून आला. पवन सिंहवर सोशल मीडियावर टीका होऊ लागली. अंजलीला देखील काही प्रमाणात ट्रोल करण्यात आले. त्यानंतर अंजलीने स्वतःच्या सोशल मीडिया हँडलवर दोन व्हिडिओ पोस्ट केले. त्यात तिनं परिस्थिती सांगितली. हा प्रकार जेव्हा घडला त्यावेळी चेहऱ्यावर हसू येणं म्हणजे त्याला समर्थन किंवा मौन स्वीकृती समजणे चुकीचे आहे, असे तिने म्हटले. तसेच पवन सिंहवर नाराजीही व्यक्त केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.