Police Station Mein Bhoot: हॉरर कॉमेडीमध्ये पहिल्यांदाच दिसणार मनोज बाजपेयी; २६ वर्षांनी 'या' दिग्दर्शकासोबत करणार काम

Police Station Mein Bhoot Movie : राम गोपाल वर्मा आता पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत परतण्यासाठी सज्ज झाले आहेत. अनेक वर्षांच्या कंटाळवाण्या चित्रपटांनंतर, दिग्दर्शकाने एका नवीन हॉरर-कॉमेडीची घोषणा केली आहे.
Police Station Mein Bhoot
Police Station Mein BhootSaam Tv
Published On

Police Station Mein Bhoot: प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आणि अनुभवी अभिनेता मनोज वाजपेयी लवकरच एका नव्या प्रोजेक्टसाठी एकत्र येणार आहेत. या दोघांची जोडी यापूर्वी 'सत्या', 'शूल', आणि 'सरकार ३' सारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. मनोज वाजपेयी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, "रामू (राम गोपाल वर्मा) माझ्यासोबत पुढचा चित्रपट बनवणार आहेत. सध्याच्या व्यस्त वेळापत्रकामुळे थोडा वेळ लागेल, पण पटकथा तयार होताच आम्ही काम सुरू करू."

या नव्या चित्रपटाबद्दल अधिक माहिती देताना मनोज वाजपेयीने स्पष्ट केले की हा गँगस्टर चित्रपट नसून, राम गोपाल वर्मा यांच्या खास शैलीतील असेल. त्याने असेही नमूद केले की, "आजच्या कॉर्पोरेट जगतात गँगस्टरची संकल्पना बदलली आहे, त्यामुळे हा चित्रपट त्या पार्श्वभूमीवर नसेल.​ रामू सरांच्या दिग्दर्शनात वेगवेगळे प्रयोग करत असतात, जी प्रत्येक दृश्याला वेगळेपण देते. त्यांच्या बंडखोर स्वभावामुळे काम करताना नेहमीच काहीतरी नवीन शिकायला मिळते." ​

Police Station Mein Bhoot
Celebrity MastarChef Finale: 'या' कलर ब्लाइंड स्पर्धकाने मिळवले टॉप ५ मध्ये स्थान; विजेता होणार या तारखेला घोषित

राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर ही घोषणा केली

राम गोपाल वर्मा आणि अभिनेता मनोज बाजपेयी अलीकडेच एकत्र आले जेव्हा त्यांचा कल्ट क्लासिक चित्रपट 'सत्या' या वर्षाच्या सुरुवातीला थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला. आता वर्मा यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून नव्या चित्रपटाची घोषणा केली. राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या एक्स हँडलवर लिहिले की, "सत्या, कौन आणि शूल नंतर, मला हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे की मनोज वाजपेयी आणि मी पुन्हा एकदा एका हॉरर कॉमेडीसाठी एकत्र येत आहोत. हा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये आम्ही दोघांनी यापूर्वी कधीही काम केलेले नाही. मी हॉरर, गँगस्टर, रोमँटिक, राजकीय नाटक, साहसी, थ्रिलर इत्यादी चित्रपट केले आहेत, परंतु कधीही हॉरर कॉमेडी नाही."

Police Station Mein Bhoot
Gulkand: ‘प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं’; ढवळे आणि माने कुटुंब घेऊन येणार मुरलेल्या प्रेमाचा नवा 'गुलकंद'!

मनोज वाजपेयी लवकरच 'डिस्पॅच' या चित्रपटात पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची विशेष स्क्रीनिंग जागरण फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार आहे. ​तसेच लवकरच त्याच्या फॅमिल मॅनचा पुढील सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com