Manobala Passed Away: प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शकाचं निधन, विनोदाचा बादशाहा सोडून गेल्याने चिपटसृष्टीवर शेककळा

Actor-Director Manobala Passes Away : बुधवारी ३ मे रोजी चेन्नईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोबाला यांच्या पश्चात त्यांची पत्नी उषा आणि मुलगा हरीश असा परिवार आहे.
Manobala Passed Away
Manobala Passed Awaysaam tv
Published On

Actor-Director Manobala Death: प्रसिद्ध कोरिओग्राफर चैतन्यच्या आत्महत्येनंतर साऊथ फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेते-दिग्दर्शक मनोबाल यांचं निधन झालं. ते 69 वर्षांचे होते. बुधवारी ३ मे रोजी चेन्नईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोबाला यांच्या पश्चात त्यांची पत्नी उषा आणि मुलगा हरीश असा परिवार आहे.

मनोबाला यांच्या निधनाने त्याच्या कुटुंबीयांसह संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी चेन्नईतील साळीग्रामम येथील एल.व्ही.प्रसाद रोडवरील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. अभिनेता-दिग्दर्शक जीएम कुमार यांनी सर्वप्रथम मनोबल यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावरून दिली. ही दुःखद बातमी शेअर करत त्यांनी ज्येष्ठ अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

Manobala Passed Away
Shah Rukh Khan: सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याला शाहरुख खानने केली धक्काबुक्की?, 'किंग खान'ची वागणूक पाहून नेटिझन्स संतापले

गेल्या दोन आठवड्यांपासून मनोबाला हे यकृताच्या समस्येने त्रस्त होते. त्यांच्यावर चेन्नईत त्यांच्या राहत्या घरी उपचार सुरू होते. तामिळ चित्रपटसृष्टीला हा मोठा धक्का आहे. मनोला यांच्या पार्थिवावर बुधवारी चेन्नईतच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मनोबाला हे पडद्यावर त्यांच्या विनोदी अभिनयासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी त्यांच्या 35 वर्षांच्या कारकिर्दीत 900 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.

Manobala Passed Away
PS2 Day 5 Collection: चित्रपटाची जगभरात यशस्वी घोडदौड; केवळ आठवडाभरात केला 'इतक्या' कोटींचा टप्पा पार

मनोबाला यांची कारकिर्द

मनोबाला यांनी 1979 मध्ये भारतीराजाच्या 'पुथिया वरपुगल' चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 35 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 900 चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. मनोबलचा शेवटचा चित्रपट काजल अग्रवालचा 'घोस्ती' होता. (Latest Entertainment News)

1982 मध्ये मनोबाला यांनी 'अगया गंगई' मधून दिग्दर्शनात पदार्पण केले. त्यांनी 25 हून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. त्यांच्या काही लोकप्रिय चित्रपटांमध्ये 'पिल्लई निला', 'ओरकावलन', 'एन पुरुषांथन एनाक्कू मट्टुमथन', 'करुप्पू वेल्लई', 'मल्लू वेट्टी मायनर' आणि 'परंबरियम' यांचा समावेश आहे. मनोबल यांनी टीव्हीवरही काम केले, तसेच अनेक कार्यक्रमांचे दिग्दर्शनही केले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com