Shah Rukh Khan
Shah Rukh Khan Saam Tv

Shah Rukh Khan: सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याला शाहरुख खानने केली धक्काबुक्की?, 'किंग खान'ची वागणूक पाहून नेटिझन्स संतापले

Latest News: या व्हिडिओवरुन शाहरुख खानला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.

Shahrukh Khan Video: बॉलीवूडचा (Bollywood) किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या चर्चेत आला आहे. सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्याला धक्काबुक्की केल्यामुळे शाहरुख खान चर्चेत आला आहे. एअर पोर्टवरील शाहरुखचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहरुख खानने चाहत्याला दिलेली वागणूक पाहून नेटिझन्स संतप्त झाले आहे. या व्हिडिओवरुन त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.

Shah Rukh Khan
TDM Director's Big Decision: ‘टीडीएम’च्या दिग्दर्शकांचा महत्वपुर्ण निर्णय; ‘माफ करा ‘टीडीएम’ प्रदर्शन थांबवतोय!’...

शाहरुख खानचा चाहतावर्ग खूपच मोठा आहे. शाहरुखच्या घरापासून ते अगदी तो जिथे-जिथे जातो तिथे त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहते मोठी गर्दी करतात. सध्या शाहरुख खानचा एअरपोर्टवरील व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये शाहरुखला पाहून त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह एका चाहत्याला आवरता येत नाही. सेल्फी घेण्यासाठी आलेल्या या चाहत्याला शाहरुख खान खूपच वाईट वागणूक देतो. तो या चाहत्याला ढकलून देतो. त्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शाहरुख खान एअरपोर्टवरुन बाहेर पडतो. तो बाहेर येताच मीडियाचे कॅमेरे आणि चाहते त्याचा फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी करतात. गर्दी टाळण्यासाठी शाहरुख खान थेट गाडीच्या दिशेने निघून जात असतो. पण त्याचवेळी त्याचा एक चाहता सेल्फी काढण्यासाठी येतो. शाहरुखला राग अनावर होतो आणि तो या चाहत्याला ढकलून देतो. यामुळे त्याच्या चाहत्याचा फोन देखील खाली पडतो. गर्दीमुळे शाहरुख खानला नक्कीच त्रास झाला असेल. पण त्याच्या या वागण्यामुळे चाहत्यांचे मन दुखावले गेले.

Shah Rukh Khan
PS2 Day 5 Collection: चित्रपटाची जगभरात यशस्वी घोडदौड; केवळ आठवडाभरात केला 'इतक्या' कोटींचा टप्पा पार

शाहरूख खानने आपल्या चाहत्याला दिलेल्या वागणुकीवरुन त्याचे नेटिझन्स चांगलेच संतप्त झाले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटिझन्स त्याला ट्रोल करत आहे. या व्हिडिओवर कमेंट्स करत नेटिझन्सने त्याला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. एका युझरने कमेंटमध्ये असे लिहिले आहे की, 'याला आणखी डोक्यावर चढवा.' दुसऱ्या युझरने कमेंट केली आहे की, 'पठाण हिट झाला पण आता जवानच्या आधीच याची वृत्ती बदलली आहे.' तर आणखी एका युझरने 'फॅन्सना थोडी इज्जत द्या.', अशी कमेंट केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com