बॉलिवूडची 'डिंपल क्वीन' अर्थात प्रिती झिंटाने (Preity Zinta) तिच्या करिअरमध्ये असंख्य सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मात्र, प्रीती लग्नानंतर बॉलिवूडपासून दुर गेली होती. पण आता पुन्हा प्रीती बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच प्रीती अभिनेता सनी देओलसोबत (Sunny Deol) एका बॉलिवूड चित्रपटातून डेब्यू करतेय. नुकतंच याबद्दलचे वृत्त समोर आले असून सध्या चित्रपटाच्या स्टारकास्टचे सिलेक्शन सुरु आहे. (Bollywood News)
प्रीती आणि सनी दोघेही 'लाहोर १९४७' (Lahore 1947) मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर या चित्रपटातून अमिर खान कॅमिओ करणार असल्याचे वृत्त मिळत आहे. मुख्य बाब म्हणजे या चित्रपटाची निर्मिती खुद्द अमिर खान करणार आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, प्रीती झिंटा अनेक वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती अखेरची 'इश्क इन पॅरिस' (Ishkq in Paris) चित्रपटात दिसली होती. अनेक वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर 'डिंपल क्वीन' बॉलिवूडमध्ये पदार्पण करते.
अभिनेत्री प्रीती झिंटा मुंबईमध्ये एका स्टुडिओमधून बाहेर पडताना स्पॉट झाली होती. नुकतंच तिने 'लाहोर १९४७' चित्रपटासाठी लूक टेस्टही दिली असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये धमाकेदार पुनरागमन करणार असल्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होते. अद्याप चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात झालेली नाही. सध्या सनी देओल त्याच्या एका चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. त्या चित्रपटाच्या शुटिंगनंतर तो 'लाहोर १९४७' चित्रपटाच्या शुटिंगला हजेरी लावेल.
प्रीती झिंटा आणि सनी देओलची जोडी याआधीही अनेक चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली आहे. दोघांनी 'हिरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय', 'फर्ज' आणि 'भैयाजी सुपरहिट' यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. सनी देओलने गेल्या वर्षी 'गदर २' मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. पिंकविलाच्या वृत्तानुसार, आरएस प्रसन्ना चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. चित्रपटाची स्टोरी तयार झाली असून फेब्रुवारीमध्ये 'लाहोर १९४७' च्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.