Abhijeet-Gautami: गौतमी पाटील आणि प्रसिद्ध गायकाच्या 'त्या' व्हिडिओमागचं गुपित अखेर फुटलं

Abhijeet-Gautami: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गायक अभिजीत सावंत आणि गौतमी पाटीलचा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत होता. आता या व्हायरल व्हिडीओचं गुपित उघडलं आहे.
Abhijeet-Gautami
Abhijeet-GautamiSaam Tv
Published On

Abhijeet-Gautami: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गायक अभिजीत सावंत आणि नृत्यांगना गौतमी पाटील यांचा AI निर्मित व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत होता. बीचवरील लोकेशन, दोघांची आकर्षक लूक केमिस्ट्री आणि अचानक समोर आलेला हा व्हिडिओ, यामुळे चाहत्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते. अखेर या गुपिताचा उलगडा झाला असून हा व्हिडिओ त्यांच्या नव्या गाण्याशी संबंधित असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

अभिजीत सावंत लवकरच ‘रुपेरी वाळूत’ हे नवीन गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या गाण्याची खास गोष्ट म्हणजे, लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलही यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दोन वेगवेगळ्या क्षेत्रातील कलाकारांची ही अनपेक्षित जोडी पाहण्यासाठी नेटिझन्स मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

अभिजीत सावंतने 2025 मध्ये सलग अनेक ट्रेंडिंग गाणी देत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘चाल तुरु तुरू’ पासून ते ‘मोहब्बते लुटाऊंगा – जेन झी व्हर्जन’ पर्यंत, त्याचा सदाबहार आवाज आणि आधुनिक साऊंड यांची उत्तम सांगड रसिकांनी मोठ्या उत्साहाने स्वीकारली. त्यामुळे आता ‘रुपेरी वाळूत’ या नव्या गाण्याबद्दल चाहत्यांच्या अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत.

Abhijeet-Gautami
Actors Death: धर्मेंद्र यांच्या निधनानंतर ३ ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

या गाण्याचा व्हिडिओ नेमका कोणत्या थीमवर आधारित आहे, तो एखाद्या जुन्या गाण्याचा नवा ट्विस्ट असेल की पूर्णत: नवीन कॉन्सेप्ट याबाबत अद्याप उत्सुकता कायम आहे. गाण्याचा लूक पाहता हे गाणं रोमँटिक मूडमध्ये असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

Abhijeet-Gautami
Ticket To Finale Winner: 'या' स्पर्धकाची BB19 च्या ग्रँड फिनालेमध्ये डायरेक्ट एन्ट्री; मिळाली खास पॉवर

५ डिसेंबरला हे गाणं अधिकृतरीत्या प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या AI व्हिडिओमुळे निर्माण झालेलं रहस्य आणि आज झालेली घोषणा या दोन्हीमुळे सोशल मीडियावर अभिजीत आणि गौतमीच्या कोलॅबबद्दल चर्चांना उधाण आलं आहे. दोघांची जोडी नव्या अंदाजात पाहण्यासाठी प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com