Abhijeet Chavan: प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या मृत्यूची अफवा; व्हायरल व्हिडिओ पाहून संतापला, म्हणाला...

Abhijeet Chavan Fake Death News: प्रसिद्ध मराठी अभिनेता अभिजीत चव्हाण यांच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर खोटी बातमी पसरल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Abhijeet Chavan Fake Death News
Abhijeet Chavan Fake Death NewsSaam tv
Published On

Abhijeet Chavan Fake Death News: प्रसिद्ध मराठी अभिनेता अभिजीत चव्हाण यांच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर खोटी बातमी पसरल्याने मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी एका युट्यूब चॅनेलवर “मराठी सिनेसृष्टीने दोन कलाकार गमावले” या शीर्षकाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. या व्हिडिओच्या थंबनेलमध्ये अभिजीत चव्हाण आणि अभिनेत्री प्रिया मराठे यांचे फोटो मुद्दाम लावण्यात आले होते. यामुळे अनेकांनी ही बातमी खरी वाटली आणि धक्का बसला. मात्र प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये दिवंगत अभिनेते आशिष वारंग यांच्या निधनाचा उल्लेख करण्यात आला होता. दिशाभूल करणाऱ्या या कृतीमुळे चाहत्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला.

ही अफवा पाहताच स्वतः अभिजीत चव्हाणला धक्का बसला. त्यांने सोशल मीडियावर संताप व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “माझ्या मृत्यूची बातमी मला पाहायला मिळाली… अजून काय पाहिजे… आता काय करायचं ह्यांचं?” त्यांच्या या शब्दांतून त्यांचा रोष स्पष्ट जाणवत होती.

Abhijeet Chavan Fake Death News
Actor Death Threats : जर तुझ्या आई, बहिणीला काहीही सांगितलंस...; प्रसिद्ध अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या
Abhijeet chavan Fake News
Abhijeet chavan Fake NewsSaam TV

या घटनेनंतर मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी अभिजीत चव्हाण यांना पाठिंबा दिला. चाहत्यांनी देखील या अफवेचा निषेध करत त्याला पाठिंबा दिला. खोटी माहिती पसरवल्यामुळे कलाकार आणि त्यांच्या कुटुंबियांना किती मानसिक त्रास होतो, हे त्याने स्पष्टपणे अधोरेखित केले.

Abhijeet Chavan Fake Death News
High Heel Side Effects: सतत हिल सॅन्डल्स घातलताय, होऊ शकतात या समस्या

अभिजीत चव्हाण यांनी युट्यूबर्स आणि सोशल मीडिया वापरणाऱ्यांना जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की अशा खोट्या बातम्या ही केवळ लोकप्रियतेसाठी केलेली हलकट करामत आहे आणि यातून कुणाचंही भलं होणार नाही. प्रेक्षकांनी सत्यता पडताळूनच अशा अफवांवर विश्वास ठेवावा, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com