Aamir khan: आमिर खान करत होता आत्महत्या करण्याचा प्रयत्न? अभिनेत्यानेच केला धक्कादायक खुलासा

Aamir khan: आमिर खान त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतो. पण एका मुलाखतीत, त्याने एक खुलासा केला आहे जो अभिनेत्याच्या चाहत्यांना धक्कादायक आहे.
Aamir khan
Aamir khanSaam tv
Published On

Aamir khan: चित्रपटांव्यतिरिक्त, बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या रिलेशनशिपसाठी चर्चेत असतो. आमिरने दोनदा लग्न केले, परंतु दोन्ही वेळा अभिनेता आपल्या पत्नींना घटस्फोट देऊन वेगळे झाला. तथापि, तो अजूनही अविवाहित आहे. अलीकडेच, आमिर खानने जाहीर केले की तो गौरी स्प्राटला डेट करत आहे.

आमिर खानने अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला आहे की जेव्हा त्याची पहिली पत्नी रीना दत्तासोबतचे त्याचे नाते संपले तेव्हा तो खूप दु:खी होता. आमिर आणि रीना यांनी बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांने १९८६ मध्ये रीनाशी गुप्तपणे लग्न केले. दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदी होते. परंतु, १६ वर्षांच्या लग्नानंतर २००२ मध्ये आमिर आणि रीना वेगळे झाले.

Aamir khan
Shefali Jariwala Husband: शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर; पती पराग त्यागीचे पहिले विधान म्हणाला, 'माझ्या परीसाठी प्रार्थना...'

आमिर म्हणाला, 'मी आणि रीना ज्या प्रकारे वेगळे झालो, त्या संध्याकाळी मी खूप दारू प्यायलो. मी दारूची संपूर्ण बाटली प्यायलो. यानंतर, पुढचे दीड वर्ष हे असेच चालू राहिले. मी दररोज दारू पित आणि दारू पिताना बेशुद्ध होत असे. मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होतो. मी कोणालाही भेटणे बंद केले होते. या काळात चित्रपटांपासून स्वतःला दूर ठेवले होते असे अभिनेत्याने सांगितले.

Aamir khan
Sitaare Zameen Par Collection: 'सितारे जमीन पर'ची 100 कोटी क्लबमध्ये एन्ट्री; अक्षय कुमार आणि सनी देओलच्या चित्रपटांचा रेकॉर्ड ब्रेक

२००२ मध्ये रीनापासून वेगळे झाल्यानंतर आमिर खानने २००५ मध्ये किरण रावशी लग्न केले. तथापि, हे नातेही कायमचे टिकू शकले नाही. किरणशी १६ वर्षे लग्न केल्यानंतर, २०२१ मध्ये आमिर खान तिच्यापासून वेगळे झाला. आमिरचा हा खुलासा आता त्याच्या चाहत्यांनाही आश्चर्यचकित करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com