Aamir Khan PK Sequel: आमिर खानचा पीके 2 लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला? 'या' अभिनेत्याची होणार खास एन्ट्री

Aamir Khan PK 2 Movie: बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी तो 'सितारे जमीन पर' हा स्पोर्ट्स कॉमेडी-ड्रामा चित्रपट घेऊन येत आहे.
Aamir Khan PK Sequel
Aamir Khan PK SequelSaam Tv
Published On

Aamir Khan PK 2 Movie: बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी तो 'सितारे जमीन पर' हा स्पोर्ट्स कॉमेडी-ड्रामा चित्रपट घेऊन येत आहे, जो २० जून २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मुलांच्या आणि खेळांच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. ज्यामध्ये विनोद आणि भावनांचा एक उत्तम तडका असेल. आमिर खान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणार आहे.

रणबीर पीकेच्या सिक्वेलमध्ये दिसणार का?

पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, आमिर खान आणि राजकुमार हिरानी देखील पीके २ च्या सिक्वेलचा विचार करत आहेत. यावेळी रणबीर कपूर चित्रपटात एलियनची भूमिका साकारताना दिसू शकतो. पीकेच्या शेवटच्या शॉर्टमध्ये रणबीरचा एन्ट्री सीन आठवतोय का? आता तो पूर्ण सिक्वेलचे रूप घेणार आहे. असे म्हटले जात आहे की पटकथेवर काम सुरू झाले आहे.

Aamir Khan PK Sequel
Preity Zinta: 'ट्रॉफीची खरी हकदार तर...'; आईपीएल 2025मध्ये पंजाब किंग्सच्या पराभवानंतर प्रीती झिंटा भावुक

आमिरचा आगामी प्रोजेक्ट दादासाहेब फाळके यांच्यावर आधारित

पण कथा इथेच संपत नाही! 'सितारे जमीन पर' नंतर आमिर खान आणखी एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात करणार आहे. आमिर दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकवरही काम करणार आहे.

Aamir Khan PK Sequel
Raghav Juyal Injured: शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटाच्या सेटवर राघव जुयाल जखमी; वेदनेतही पूर्ण केली शूटिंग

हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारित असेल. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे हा बायोपिक स्वतः राजकुमार हिरानी दिग्दर्शित करणार आहेत, ज्यांची कथा सांगण्याची शैली सर्वांनाच आवडते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com