Rupali And Gauri Dance: गुलाबी साडी नेसून 'अंगारो सा' गाण्यावर संजना अन् गौरीचा जबरदस्त डान्स; पाहा VIDEO

Rupali Bhosale And Gauri Kulkarni Dance Video: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री रुपाली भोसले आणि गौरी कुलकर्णीने अंगारो सा या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Rupali And Gauri Dance
Rupali And Gauri DanceSaam Tv

आई कुठे काय करते फेम अभिनेत्री रुपाली भोसलेने काही दिवसांपूर्वीच नवीन घर खरेदी केले आहे. रुपाली भोसलेच्या नवीन घरात गृहप्रवेशाच्या दिवशी अनेक कलाकार मित्रमैत्रिणींनी हजेरी लावली होती. रुपाली भोसलेने गृहप्रवेशाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला रुपालीची खास मैत्रिण अन् ऑनस्क्रिन भाची म्हणजेच गौरी कुलकर्णीनेदेखील हजेरी लावली होती. गृहप्रवेशाच्या दिवशी गौरी आणि रुपालीने अंगारो सा गाण्यावर भन्नाट रिल शेअर केली आहे.

Rupali And Gauri Dance
Salman Khan Threat Case : सलमान खानला मारण्यासाठी थेट पाकिस्तानमधून मागवली हत्यारे? आरोपपत्रातून धक्कादायक खुलासे

गौरी कुलकर्णी आणि रुपाली भोसलेने रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनच्या अंगारो सा गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. त्यांनी लाजरान् साजरा मुखडा आणि अंगारो सा या रिमिक्स गाण्यावर रिल बनवली आहे. या व्हिडिओत त्या दोघीही गाण्याच्या हुक स्टेप करताना दिसत आहे. त्याचसोबत त्याला मराठमोळी तडका म्हणून लाजरान् साजरा मुखडा गाण्यावर ठेका धरला आहे. त्यांचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे.

Rupali And Gauri Dance
प्रभास- दीपिकाच्या 'Kalki 2898 AD'ची छप्परतोड कमाई; शाहरुखच्या 'Jawan'लाही मागे टाकलं, पहिल्या आठवड्याला किती कमावले?

गौरी आणि रुपालीने ही रिल शूट करताना गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. रुपालीने नऊवारी साडी नेसून त्यावर मराठमोळा लूक केला आहे. तर गौरीने काठपदर साडी नेसली आहे. दोघीही या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. गौरी आणि रुपालीच्या या रिलवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

रुपाली भोसले सध्या 'आई कुठे काय करते' या मालिकेत काम करत आहे. ती या मालिकेत संजना हे पात्र साकारत आहे. तर गौरी कुलकर्णी 'प्रेमास रंग यावे' या मराठी मालिकेत काम करत आहे.

Rupali And Gauri Dance
Alia Bhatt Fitness Mantra: एका मुलीची आई असूनही अलिया दिसते एकदम तरूण, फिटनेसचं रहस्य काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com