Aai Kuthe Kay Karte Update : अरुंधती-आशुतोषमध्ये येणार दुरावा ? वीणाच्या मदतीने अनिरुद्ध खेळतोय नवी खेळी

Aai Kuthe Kay Karte Latest Update : अरुधंतीला पुरस्कार समारंभाला उपस्थित राहता येत नाही.
Aai Kuthe Kay Karte Latest Update
Aai Kuthe Kay Karte Latest UpdateSaam TV
Published On

Aai Kuthe Kay Karte 23 June Episode Update : छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' ही मालिका लोकप्रिय आहे. 'आई कुठे काय करते' मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. मालिकेत अरुंधती-आशितोषचं नात फुलत आहे. पण अरुंधती - आशुतोषच्या गोड नात्यात अनिरुद्ध दुरावा आणण्याचा प्रयत्न करणार आहे. वीणाच्या येण्याने ट्वीस्ट अजूनच वाढला आहे.

'आई कुठे काय करते' मालिका महाराष्ट्रातील घराघरात पाहिली जाते. मालिकेतील अरुंधती तमाम प्रेक्षक रिलेट करतात. मालिकेत रोज नवीन काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. नुकताच मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये नवीन एपिसोडबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. (Latest Entertainment News)

मालिकेच्या येत्या भागात नवीन ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. प्रोमोमध्ये अरुंधती भावूक दिसत आहे. "आई आणि बायकोच्या पारड्यात आईचं पारड जड ठरलं. बायको म्हणून मी कमी पडले.पण मी तुम्हाला वचन देते की, माझ्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली आपलं नातं दबू देणार नाही". असं म्हणत अरुंधती आशुतोषला मीठी मारते.

Aai Kuthe Kay Karte Latest Update
Rocky Aur Rani Ki Prem Kahani बिग बजेट चित्रपटातील कलाकरांचे मानधनही आहे बक्कळ; आकडा पाहून थक्क व्हाल

यानंतर वीणा अनिरुद्धशी एकमेकांशी बोलत असतात. तर वीना अनिरुद्धला म्हणते, "आशु खूप शोषिक आहे. अरुधंती आशुतोषच्या भोळेपणाचा फायदा घेत आहे". वीणाच्या अशा बोलण्यानं अनिरुद्धला मात्र खूप आनंद झाल्याचं दिसत आहे. प्रोमोच्या शेवटी अनिरुद्ध म्हणतो की, "अनिरुद्ध आणि आशुतोषचं नात फार काळ काही टिकणार नाही".

मागील एपिसोडमध्ये आशुतोषला 'बिझनेसमॅन ऑफ द अवॉर्ड' हा पुरस्कार मिळणार होता. त्या कार्यक्रमाच्या आधी अरुंधती आशुतोषचं कौतुक करायला त्याला डेटवर घेऊन जाते. ते दोघे बोल्ट असतानाच अरुंधतीला देशमुखांच्या घरून फोन येतो. यश अरुंधतीला अभी सापडत नसल्याचे सांगतो. त्यानंतर अरुंधती देशमुखांच्या घरी जाते.

या प्रसंगामुळे अरुधंतीला पुरस्कार समारंभाला उपस्थित राहता येत नाही. त्यामुळे वीणा मात्र अरुंधतीवर रागवते. आशुतोषच्या खूप महत्तवाच्या दिवशी अरुंधती त्याच्यासोबत नव्हती म्हणून वीणाला अरुंधतीचा राग येतो. वीणा हा राग अरुंधतीला बोलूनही दाखवते. आशुतोषच्या पुरस्कार समारंभाला अरुंधती उपस्थित रहता न आल्याने अरूंधतीला देखील वाईट वाटत.

वीणा अनिरुद्धसमोर अरुंधती अणि आशुतोष विषयी बोलून जाते. वीणामुळे आता अनिरुद्धाला केळकरांच्या घरात अणि अरुंधती अणि आशुतोषच्या नात्यात डोकवायला वाव मिळाला आहे. अनिरुद्ध याचा नक्कीचा फायदा करून घेणार . वीणाला आपल्या जाळ्यात अडकवून आता अरुंधती आणि आशुतोषमध्ये अनिरुद्ध फूट पाडणार का? अनिरुद्ध वीणाचा कसा फायदा करुन घेणार? आणि वीणा अनिरुद्धच्या बनावट चेहऱ्याला भूळणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com