दिवसेंदिवस प्रेक्षकांचा चित्रपट, वेबसीरीज आणि वेबफिल्ममधील कंटेंट पाहण्याचा कल सुद्धा बदलला आहे. त्यासोबतच प्रेक्षक सध्या सर्वाधिक ओटीटीवरच आपले आवडते चित्रपट पाहणे पसंद करतात.
जानेवारी २०२४ च्या ह्या दुसऱ्या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे चित्रपट आणि वेबसीरीज रिलीज होणार आहेत. यंदाच्या आठवड्यात प्रेक्षकांसाठी ‘फुल्ल टू एंटरटेन’ असणार यामध्ये कोणतीच शंका नाही.
‘द केरला स्टोरी’ आणि ‘टायगर ३’पर्यंत अनेक वेगवेगळे धाटणीचे चित्रपट रिलीज होणार आहेत. त्यासोबतच काही वेबसीरीजही रिलीज होणार आहेत.
मायाची कथा इकोमधून दाखवली आहे.. मायाच्या जन्मगावी जे काही घडलं त्याचा संदर्भ आपल्याला मिळणार आहे. ११ जानेवारीला 'डिझ्ने प्लस हॉटस्टार'वर ही वेबसीरीज रिलीज होणार आहे.
अभिनेता मनोज वाजपेयीचा 'द सूप' ही सीरीज येत्या ११ जानेवारी २०२४ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सयाजी शिंदेसह अनेक टॉलिवूड सेलिब्रिटी दिसणार आहे.
'कोटाबोम्मल्ली पीएस' या सीरीजचे कथानक एका पोलीस अधिकाऱ्या भोवती फिरणारं आहे. त्यातून प्रेक्षकांना धक्कादायक खुलासे पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट ११ जानेवारी २०२४ ला 'अहा' या ओटीटीवर रिलीज होणार आहे.
सलमान खान आणि कतरिना कैफचा 'टायगर ३' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळाला असून हा चित्रपट ७ जानेवारीला ओटीटीवर रिलीज झाला आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट 'ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ' वर पाहू शकणार आहे.
'द केरळ स्टोरी' या चित्रपटाचे ओटीटी राईट्स Zee 5 या ओटीटीने विकत घेतले आहेत. या चित्रपटाचं कथानक तीन मुलींवर आधारित आहे. अदा शर्मासह योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्धी डडनानी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट १२ जानेवारी २०२४ ला रिलीज होण्याची शक्यता आहे.
'ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ' वर ११ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. मिशन इम्पॉसिबलच्या आधीच्याही सीरीजलाही चाहत्यांनीही उत्तम प्रतिसाद दिला होता.
गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक 'द लिजंड ऑफ हनुमान'च्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत होते. पहिल्या दोन्ही सीझनला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला तिसरा सीझन येतोय. या सीरिजमध्ये भगवान हनुमान यांच्या पराक्रम अन् त्यांची शौर्यगाथा या निमित्तानं समोर येणार आहे. १२ जानेवारी नंतर ही मालिका 'डिझ्ने प्लस हॉटस्टार'वर प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.