Jalna Crime News : जुन्या वादातून अपहरण, गाडीत डांबून बेदम मारहाण; आज अज्ञातस्थळी मृतदेह, जालन्यात खळबळ

Jalna Crime : अपहरण झालेल्या सुरेश आर्दड याचा बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तडेगाव-टाकरखेडा रोडवर शेतात मृतदेह आढळून आला आहे. या घटनेनं जालना जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
kidnapping and murder of a young man from Ghansawangi
kidnapping and murder of a young man from GhansawangiSaam Tv News
Published On

जालना : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातल्या कुंभार पिंपळगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास गावठी पिस्तूल आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवून तरुणाचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आलीय. सुरेश आर्दड (वय ३३, रा. राजाटाकळी) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. या तरुणाचं चार जणांनी चारचाकी वाहनामध्ये कोंबून अपहरण केलं होतं.

दरम्यान, अपहरण झालेल्या सुरेश आर्दड याचा बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तडेगाव-टाकरखेडा रोडवर शेतात मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी सुभाष आर्दड यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरोधात घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या संपूर्ण घटनेप्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं विशेष पथक तयार करण्यात आलं. अपहरण करणारे हे चारही जण वाळू माफिया असल्याची माहिती आता समोर आली आहे.

kidnapping and murder of a young man from Ghansawangi
Badlapur News : नदीवर मित्रांसोबत पार्टीला गेला, पाण्यात बुडून आशिष ४ दिवसांपासून बेपत्ता; आई-बापाचं आकांत

वडिलांनी कुऱ्हाडीचे घाव घालून पोटच्या लेकीला संपवलं

जन्मदात्या बापानेच कुऱ्हाडीचे घाव घालत पोटच्या मुलीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिवमध्ये घडला आहे. आरोपीने मुलीची हत्या करुन तिचा मृतदेह २४ तास घरात ठेवला होता. या प्रकरणी धाराशिवमधील आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्याच्या माणिकनगर शेळगाव येथे हा भीषण प्रकार घडला आहे. मुलगी सतत आजारी पडत असल्याने आणि ती सायकलवरुन खाली पडल्याने रागाच्या भरात आरोपीने कुऱ्हाडीचे घाव घालत त्याच्या मुलीची हत्या केली. हत्येच्या वेळी आरोपी दारुच्या नशेमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर महादेव जाधव या व्यक्तीने त्याच्या नऊ वर्षांच्या मुलीला संपवले. त्याने कुऱ्हाडीने घाव घालत मुलीची हत्या केली. त्यानंतर मुलीचा मृतदेह तब्बल २४ तास घरातच ठेवला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत आरोपीला अटक केली. आंबी पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

kidnapping and murder of a young man from Ghansawangi
Parola Crime : दागिन्यांसाठी महिलेची हत्या; संशयिताला धुळे जिल्ह्यातून अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com