Dombivli : डोंबिवलीत गावगुंडांचा ट्रक चालकावर प्राणघातक हल्ला, एकास अटक

Kalyan Dombivli Crime News : या प्रकरणात विष्णूनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तो एका राजकीय नेत्याचा निकटवर्तीय असल्याची चर्चा दबक्या आवाजात परिसरात आहे.
vishnu nagar police arrests youth in dombivli
vishnu nagar police arrests youth in dombivliSaam Digital

- अभिजित देशमुख

डोंबिवली पश्चिमेत गावगुंडांचे दहशत समोर आली आहे. आमच्या परिसरात माल उतरवतोस, आमच्या हमाला काम का देत नाही असे विचारत ट्रक चालकावर गावगुंडाने धारदार शस्त्राने हल्ला केला. ही घटना डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर परिसरात घडली. या प्रकरणी विष्णू नगर पोलिसांनी एकास अटक केली आहे. अन्य साथीदाराचा पाेलिस शाेध घेताहेत.(Maharashtra News)

सुनील कुऱ्हाडे (एसीपी डोंबिवली) यांनी घटनेची माहिती दिली. ते म्हणाले डोंबिवली पश्चिमेतील कोपर रोड परिसरात सिद्धाई या इमारतीचे प्लास्टरचे काम सुरु आहे. प्लास्टरसाठी लागणारा माल घेऊन एक ट्रक आला. हा माल इमारतीसमोर उतरविण्याचे काम सुरु होते. हे काम सुरु असताना त्याठिकाणी अचानक दोन जण आले. त्या दोघांनी ट्रक चालकाला गाडीमधून खाली उतरविले.

vishnu nagar police arrests youth in dombivli
पुणे : खराडीमध्ये हाॅटेलला भीषण आग, अग्निशामक पथकाचे धाडस; 6 गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने टळला माेठा धाेका

ट्रक चालक बालाजी कोपनर याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. आमच्या एरियात येऊन माल खाली करतोयस. आमच्या हमालाला माल उतविरण्याचे काम देत नाही. तुला हे करण्यास कोणी सांगितले असे विचारले. चालक बालाजी मी माझे काम करतो. माझ्याशी का वाद घालता असे उत्तर दिले.

त्यामुळे संतापलेल्या त्या दोन्ही तरुणांनी ट्रक चालक बालाजी यांचे काही एक न ऐकता त्याला मारहाण सुरु केली. ट्रक चालकाच्या मानेवर आणि शरीरावर धारदार हत्याराने वार केले. या हल्ल्यात ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्रकरणात विष्णूनगर पोलिसांनी अक्षय कारंडे याला अटक केली आहे. अक्षय याच्या विरोधात यापूर्वीही गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तो एका राजकीय नेत्याचा निकटवर्तीय असल्याची चर्चा दबक्या आवाजात परिसरात आहे. या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी विशाल पानवलकर याचा पोलिस शोध घेताहेत आहे. दरम्यान या घटनेमुळे डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

vishnu nagar police arrests youth in dombivli
तुळजापूर: देवीच्या सोने-चांदी अपहार प्रकरणी दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा अवमान याचिका दाखल करणार : हिंदु जनजागृती समिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com