Virar Crime: 'टायरमध्ये टाकून मारेन...' पोलिसांची धमकी, तरुणाने व्हिडिओ बनवत संपवले आयुष्य; विरारमधील घटना
Virar Crime NewsSaamtv

Virar Crime: 'टायरमध्ये टाकून मारेन...' पोलिसांची धमकी, तरुणाने व्हिडिओ बनवत संपवले आयुष्य; विरारमधील घटना

Virar Crime News: लिसांनी धमकावल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे या व्हिडिओत म्हटल आहे. संबंधित पोलिसांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केले आहे.

महेंद्र वानखेडे, विरार|ता. २१ एप्रिल २०२४

विरार पोलिसांनी एका तरुणाला पती-पत्नीच्या भांडणात जेलमध्ये टाकून ठेवण्याची धमकी दिल्यामुळे एका तरुणाने स्वतःचा व्हिडिओ तयार करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी धमकावल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे या व्हिडिओत म्हटल आहे. संबंधित पोलिसांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलिसांनी धमकी दिल्यामुळे एका तरुणाने स्वतःचा व्हिडिओ तयार करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना विरार परिसरात घडली. आत्महत्येपूर्वी या तरुणाने स्वतःचा व्हिडिओ तयार केला असून त्यामध्ये त्याने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, विरारच्या पोलिसांनी अभय पालशेतकर (वय २८) या तरुणाला जेलमध्ये टाकू कायमचा खडे फोडायला लावू तुला कोण वकील देतो ते आम्ही पाहू अशा प्रकारे धमकावल्यामुळे त्याने आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली आहे.

Virar Crime: 'टायरमध्ये टाकून मारेन...' पोलिसांची धमकी, तरुणाने व्हिडिओ बनवत संपवले आयुष्य; विरारमधील घटना
Bus Fire News: मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अग्नितांडव; वऱ्हाडाची बस पूर्णपणे जळून खाक

घरगुती कारणावरून अभयच्या बायकोने अभय आणि त्याच्या आई विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. यावेळी सुनील पवार नावाच्या पोलिसाने त्याला कोंबडा करून मारू टायर मध्ये घालून मारू अशी धमकी दिली होती. दरम्यान, या घटनेनंतर तरुणाच्या नातेवाईकांनी आक्रमक घेतली असून संबंधित पोलिसावर तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Virar Crime: 'टायरमध्ये टाकून मारेन...' पोलिसांची धमकी, तरुणाने व्हिडिओ बनवत संपवले आयुष्य; विरारमधील घटना
Voting Card: अजूनही मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी, जाणून घ्या काय आहे प्रक्रिया

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com