Hingoli: भाजप पदाधिकाऱ्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल, वसमतमध्ये नेमकं काय घडलं?

vasmat police charged 8 along with bjp leader in fighting case: वसमत पाेलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेतात तातडीने ठाेस पावलं उचलत काहींची धरपकड केली.
vasmat police charged 8 along with bjp leader in fighting case
vasmat police charged 8 along with bjp leader in fighting caseSaam Digital

हिंगोली येथील वसमत मध्ये भाजप पदाधिकाऱ्यासह आठ जणांवर पाेलिसांकडून गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. मारामारी प्रकरणी गुन्हा नाेंदविण्यात आल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

वसमत शहरात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शिवदास बुडेवार यांच्या सहा ते सात जणांनी आपापसात रस्त्यावर हाणामारी करत धुडगूस घातल्याची घटना घडली हाेती. या घटनेनंतर वसमत पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्यासह सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करत त्यांची धरपकड सुरू केली आहे.

vasmat police charged 8 along with bjp leader in fighting case
'Wagh Nakh': ठरलं तर मग! छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं थेट राजधानी साताऱ्यात, कधी येणार? (पाहा व्हिडिओ)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार जबी खान पठाण, शेख अल्ताफ शेख युसुफ, शेख अनिस शेख इक्बाल, संकेत नगपल्ली, गोविंद येजगे, बालाजी कदम यांच्यासह इतर दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

या घटनेतील संशयित आरोपींनी वसमत शहरातील काळीपेठ भागात दहशत माजवत हाणामारी केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. हा वाद नेमक्या कोणत्या कारणाने झाला याचा तपास पाेलिस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

vasmat police charged 8 along with bjp leader in fighting case
Dhule: जवाहर सुतगिरणी कधी सुरु हाेणार? आमदार कुणाल पाटलांना बेराेजगारांचा सवाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com