दारुच्या नशेत पत्नील घाबरवण्यासाठी व्हिडिओ कॉलवर गळफास घेण्याचं नाटक एका तरुणाला चांगलेच महागात पडले. पत्नीला घाबरवण्याच्या नादात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक अन् हादरवुन टाकणारी घटना उत्तर प्रदेशमधून समोर आली आहे. या भयानक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना पैलानी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खपटीहा काला गावात सोमवारी रात्री (4, मार्च) घडली. गावातील रहिवासी राम किशोर वर्मा यांचा मुलगा अनिल (32) हा गेल्या तीन-चार वर्षांपासून हरियाणातील एका खासगी कंपनीत कामाला होता. तो काही दिवस त्याच्या गावात होता.
सोमवारी रात्री दहाच्या सुमारास त्याने पत्नीला व्हिडिओ कॉलिंगद्वारे गळ्यात दोरी बांधून फाशी देण्याची धमकी दिली. पती दारूच्या नशेत असल्याचे जाणून पत्नीनेही पतीला समजवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पती वारंवार दोरीचा फास घट्ट बांधण्याचे नाटक करत होता. त्यानंतर अचानक दोरीचा फास त्याच्या गळ्याभोवती घट्ट बसला आणि काही क्षणातच तो लटकला, या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. (Crime News in Marathi)
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान, त्याचा लहान भाऊ विमल याला घटनेची माहिती मिळताच त्याने अनिलच्या खोलीकडे धाव घेतली मात्र खोलीचा दरवाजा आतून बंद होता. कसातरी तो दरवाजा तोडून आत पोहोचला आणि भाऊ लटकलेला दिसला. घाईघाईने त्याला खाली उतरवले असता त्याचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. चेष्टा मस्करीत एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.