UP, Soap Factory Explosion
मेरठ, लोहियानगर भागात एका साबण बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट होऊन चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर सात कामगार गंभीर जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटानंतर घटनास्थळी लगेचच पोलीस आणि एनडीआरएफची टीम दाखल झाली आणि ढिगाऱ्याखाली अडक
हा स्फोट इतका भयंकर होता की, आजूबाजूच्या घरांना सुद्धा हादरे जाणवले. तसेच या घरांमधील काही रहिवाशी आणि रस्त्यावरून जाणारे काही लोक जखमी झाले आहेत.
एसएसपी रोहित सिंह सजवाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहियानगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत सत्यकाम शाळेच्या समोर एका भाड्याने घेतलेल्या घरात हा कारखाना सुरू होता. या कारखान्यात मंगळवारी झालेला स्फोट बॉयलरचा होता की साबण बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अन्य कोणत्या केमिकलचा आहे, याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. या घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, एनडीआरएफचं रेस्क्यु सुरू असताना पुन्हा स्फोट झाला. त्यामुळे काहीकाळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. स्फोटामुळे दरड आणि विटा आजूबाजूला जमलेल्या नागरिकांच्या डोक्यात पडल्या. ५० फूटांपर्यंत धुळीचे लोळ उडाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.