Mumbai News: बोरिवलीत महिला डॉग फिडरला मारहाण, विनयभंगाचा गुन्हा दाखल

Borivali Stray Dog: भटक्या कुत्र्यांवरील प्रेम आणि त्यांना अन्न देण्याच्या रागातून अनेकवेळा मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान अशीच एक घटना बोरिवलीतील योगीनगर येथे घडली आहे
Mumbai News
Mumbai NewsSaam Digital
Published On

Mumbai News

भटक्या कुत्र्यांवरील प्रेम आणि त्यांना अन्न देण्याच्या रागातून अनेकवेळा मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान अशीच एक घटना बोरिवलीतील योगीनगर येथे घडली आहे. येथील एका महिला डॉग फिडरला मारहाण झाली असून याप्रकरणी अमन बनसोडे या व्यक्तीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण झालेली महिला भटक्या कुत्र्यांची काळजी घेते. त्यांना अन्न देण्याचं काम करते. या रागातून अमन बनसोडे या व्यक्तीने सदर महिलेच्या पालकांसमोरच तीला मारहाण केली. बोरीवलीतील योगीनगरमध्ये ही घटना घडली होती. त्यानंतर या महिलेने याबाबत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एमएचबी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Mumbai News
Crime News: मुंबई क्राईम ब्रँचकडून सोलापुरातील ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश; १०० कोटी रुपयांचे साहित्य जप्त

भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि त्यांचा होणारा उपद्रव यामुळे अनेकांमध्ये या कुत्र्यांची भीती असते. शिवाय या कुत्र्यांचे रात्री अपरात्री हल्ले पण वाढले आहेत. त्यामुळे अनेकांना कुत्र्यांबाबत राग आणि चिड असते. मात्र, या भटक्या कुत्र्यांची काहीजण काळजीही घेताना दिसतात. निराधार असल्यामुळे त्यांना अन्न देण्याचं काम करतात. यातून अशा व्यक्तींना अनेकवेळा मारहाण झाली आहे.

Mumbai News
Mahadev Betting App : 'महादेव बेटींग अ‍ॅप' प्रकरणातील मुख्य सुत्रधाराला अटक; मुंबई विमानतळावर आवळल्या मुसक्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com