UP Crime: बहिणीच्या लग्नात टीव्ही द्यायची इच्छा.. पत्नीने विरोध केला; भावांच्या मदतीने पतीला संपवलं!

Uttar Pradesh Crime News: बहिणीच्या लग्नात पती टीव्ही देणार होता मात्र पत्नीने त्याला विरोध केल्याने हा वाद झाला ज्यामध्ये तरुणाचा जीव गेला. उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
UP Crime: बहिणीच्या लग्नात टीव्ही द्यायची इच्छा.. पत्नीने विरोध केला; भावांच्या मदतीने पतीला संपवलं
UP CrimeSaam Tv

बहिणीच्या लग्नात टीव्ही देण्यावरुन झालेल्या वादातून तरुणाची पत्नी आणि तिच्या भावांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीच्या लग्नात पती टीव्ही देणार होता मात्र पत्नीने त्याला विरोध केल्याने हा वाद झाला ज्यामध्ये तरुणाचा जीव गेला. उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

हे संपूर्ण प्रकरण बद्दुपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहारी मजरे झारसावा गावातील आहे.या ठिकाणी राहणारा तरुण चंद्रप्रकाश मिश्रा (वय, ३५) यांची बहीण पूजा हिचे 26 एप्रिल रोजी लग्न आहे. चंद्रप्रकाशही आपल्या बहिणीच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. त्याला आपल्या बहिणीच्या लग्नात एलईडी टीव्ही आणि सोन्याची अंगठी द्यायची होती, मात्र त्याची पत्नी छवी मिश्रा त्याला विरोध करत होती.

यावरूनच पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादानंतर महिलेने तिच्या भावासह अन्य चार-पाच जणांना रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कादराबाद येथील तिच्या माहेरी बोलावले. घरात लग्नासाठी मंडप उभारला जात असताना पत्नीच्या माहेरच्या लोकांनी चंद्र प्रकाशला काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला.

UP Crime: बहिणीच्या लग्नात टीव्ही द्यायची इच्छा.. पत्नीने विरोध केला; भावांच्या मदतीने पतीला संपवलं
Beed Politics: ' मनोज जरांगे पाटलांचं नाव घेऊन राजकारण कराल, तर...'; आमदार सुनील शेळकेंचा विरोधकांना इशारा

या घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले आणि त्यांनी चंद्रप्रकाशला गंभीर अवस्थेत सीएचसी घुंगटेर येथे नेले. तेथून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात बाराबंकी येथे रेफर करण्यात आले, मात्र जिल्हा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने लग्नघरावर शोककळा पसरली असून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

UP Crime: बहिणीच्या लग्नात टीव्ही द्यायची इच्छा.. पत्नीने विरोध केला; भावांच्या मदतीने पतीला संपवलं
Raj Thackeray: राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा, मोबदल्यात ठाकरेंना काय मिळणार? समोर आली माहिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com