CCTV Video: धारदार शस्त्राने वार, मग दुचाकीवरून फरपटत नेलं; नोएडामधील काळजाचा थरकाप उडवणारी घटना VIDEO

Uttar Pradesh Crime: मेहंदीसोबत या दोघांचं काही दिवसांपूर्वी जोरदार भांडण झालं होतं. आधीचा राग मनात धरून त्यांनी मेहंदीला एका ठिकाणी गाठलं. त्यांनी त्यावर चाकूने वार केले.
CCTV Video
CCTV VideoSaam TV
Published On

Uttar Pradesh:

नोएडा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे दोन तरुणांनी एका व्यक्तीवर चाकूने हल्ला केलाय. नाराधमांनी यावर न थांबता त्या व्यक्तीला दुचाकीवरून फरपटत देखील नेलं. सदर व्यक्तीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

CCTV Video
Uttar Pradesh News: थंड पाणी प्यायला, मैदानावर कोसळला.. क्रिकेट खेळता खेळता १०वीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; काय घडलं?

घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अनुज आणि नितिन असं या दोन्ही आरोपी तरुणांचं नाव आहे. तर मेहंदी हसन असं मृत तरुणाचं नाव आहे. मेहंदीसोबत या दोघांचं काही दिवसांपूर्वी जोरदार भांडण झालं होतं. आधीचा राग मनात धरून त्यांनी मेहंदीला एका ठिकाणी गाठलं. त्यांनी मेहंदीवर चाकूने वार केले. तसेच दुचाकीला त्याला बांधून बऱ्याच अंतरावर फरपटत नेलं.

पोलिसांना घटनेची महिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मेहंदीवर उपचार सुरू असताना त्याच्या कुटुंबियांनी अनुज आणि नितिन या दोघांची नावे घेतली होती. पोलिसांनी या दोन्ही तरुणांचा शोध सुरू केला. तपासावेळी दोघेही पोलिसांना गुंगारा देत त्यांच्या हातून निसटत होते. अशात काल रात्री पोलिसांना या दोघांबाबत टीम मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि दोघांच्याही मुसक्या आवळल्या. यावेळी पोलीस आणि या दोघांमध्ये चकमक झाली. पोलिसांनी सांगितले की, आरोपींना घेऊन जात असताना त्यांनी आमच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. झालेल्या झटापटीत पोलिसांनी देखील फायरिंग केली. यावेळी दोन्ही आरोपींना गोळी लागली आणि ते जखमी झाले. या दोघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

CCTV Video
Noida Crime News: 100 एकर जमीन, वर्चस्वाची लढाई आणि ५ हत्या; एअरलाइन्सच्या क्रू मेंबरच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com