Shocking Crime: आई नाही तर वैरणी! ५ महिनेच्या मुलीसह पोटच्या तीन मुलींचा घेतला जीव, नंतर...

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील एका महिलेने तिच्या ७, २ आणि ५ महिन्यांच्या तीन मुलींचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिने स्वतःचे जीवन संपवले. पोलिसांनी या दुःखद कौटुंबिक आत्महत्येप्रकरणी तपास सुरू केला आहे.
Uttar Pradesh Crime:
Heartbreaking tragedy in Baghpat – Mother strangles three daughterssaamtv
Published On
Summary
  • बागपत जिल्ह्यात आईने तीन मुलींचा गळा दाबून खून केला.

  • गुंजन (७), किट्टू (२) आणि मीरा (५ महिने) या तिन्ही मुलीचा मृत्यू.

  • कौटुंबिक त्रासाला कंटाळून महिलेने नंतर आत्महत्या केली

उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली. घरगुती त्रासाला कंटाळून एका महिलेने तिच्या तीन निष्पाप मुलीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर गळफास घेत महिलेने आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडालीय. दरम्यान या घटनेची माहिती होताच पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करत तपास सुरू केलाय.

Uttar Pradesh Crime:
Beed Crime Govind Barge Death: आत्महत्येपूर्वी गोविंद बर्गेंचा एकाला व्हिडिओ कॉल, घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं, नवी माहिती समोर

ही धक्कादायक घटना दोघट तालुक्यात घडलीय. येथील टोकरी गावातील भोजुपुरी पट्टी परिसरात ही घटना घडलीय. मिळालेल्या माहितीनुसार, तुज कुमारी (२९ वर्ष) असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. तर विकास तिच्या पतीचे नाव आहे. विकास हा बस ड्रायव्हर आहे. मंगळवारी रात्री तेज कुमारी यांनी तीन चिमुकलीचा गळा दाबून खून केला. गुंजन (७), किट्टू (२), आणि मीरा (५ महिने) अशी मुलीची नावे आहेत. तिन्ही मुलीची हत्या केल्यानंतर महिलेने गळफास घेत आत्महत्या केली.

Uttar Pradesh Crime:
Snake In Ration Rice: बापरे! रेशनच्या तांदळात आढळला मेलेला साप; चार दिवस खाल्ल्यानंतर...; सोलापुरातील धक्कादायक प्रकार

घरगुती वाद आणि आर्थिक चणचणीमुळे महिलेने आत्महत्या केली. तेज कुमारी आणि विकास यांच्या घरात वाद चालू होता. आर्थिक कटकटीमुळे विकास आणि तेज कुमारी यांच्यात भांडणं होत होती. त्याच कारणातून तेज कुमारी महिलेनं तीन मुलीची हत्या केली, त्यानंतर आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी पोहोचले.

फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरील पुरावे गोळा केली. तिन्ही मुलांचे आणि आईचे मृतदेह पंचनामे करून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेत. दरम्यान या प्रकरणाचा पोलीस बारकाईने तपास करत आहेत. शेजारीली लोकांचा जाब घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com