Budaun Judge: महिला न्यायाधीशानं जीवन संपवलं; सरकारी निवासस्थानी आढळला मृतदेह

Uttar Pradesh News: महिला न्यायाधीशाच्या शासकीय निवासस्थानाची खिडकी पोलिसांनी तोडली असता तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी महिला न्यायाधीशाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. मृत महिला न्यायाधीशाच्या घरातून पोलिसांना काही कागदपत्रे आणि एक सुसाईड नोटही सापडली आहे.
Budaun Judge
Budaun JudgeANI
Published On

Budaun Judge ends Her life In Government Residence:

सिव्हिल न्यायाधीश ज्युनिअर डिव्हिजनच्या पदावर कार्यरत असलेल्या एका महिला न्यायाधीशाने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. ही घटना उत्तर प्रदेशाच्या बदायू जिल्ह्यात घडली. सरकारी निवासस्थानी महिला न्यायाधीशाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडालीय. या मिळालेल्या माहितीनुसार, या महिला न्यायाधीशाचे नाव ज्योत्स्ना राय आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Latest News)

महिला न्यायाधीश सिव्हिल लाइंस कोतवाली परिसरात जाजिज कॉलनीमध्ये राहत होत्या. न्यायाधीश ज्योत्साना राय यांच्या सरकारी निवासस्थानाचा दरवाजा बंद होता. शेजारी राहणाऱ्या लोकांना काहीतरी वाईट घडल्याचा संशय आला. तसेच न्यायाधीश राय ह्या आपल्या वेळेवर कोर्टात पोहोचल्या नाहीत. तेव्हा त्यांच्या सहकारी न्यायायाधीशाने त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा काही कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याने सहकारी न्यायाधीशांनी पोलिसांना सूचना दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांना सुचना मिळाल्यानंतर पोलीस सरकारी निवासस्थानी पोहोचले. पोलिसांनी आवाज दिल्यानंतर कोणताच प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांनी घराच्या खिडकीतून घरात डोकावून पाहिलं. त्यावेळी न्यायाधीशांचा मृतदेह सिलिंग पंख्याला लटकलेला दिसला. त्यानंतर पोलिसांनी खिडकी तोडून घरात प्रवेश केला.पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी न्यायाधीशांचा मृतदेह खाली उतरवला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. याविषयीची माहिती एसएसपी अलोक प्रियकदर्शी यांनी दिली. दरम्यान पोलिसांना मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट मिळालीय.

मृत न्यायाधीश ज्योत्स्ना राय ह्या उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातील रहिवाशी होत्या. २०१९ मध्ये त्यांची न्यायिक सेवेमध्ये नियुक्ती झाली होती. एप्रिल २०२३ मध्ये बदायूं येथे त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. बदायूंमध्ये पदावर रुजू झाल्याच्या वर्षभरातच महिला न्यायाधीशाने आत्महत्या का केली? यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि खोलीत सापडलेल्या सुसाईड नोटच्या आधारे मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Budaun Judge
Bhandara Crime News : वाळू चोरीसाठी लढवली अनोखी शक्कल, एकाच नंबरच्या दाेन वाहनांवर महसूलची कारवाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com