Girl Student Stalking: माझ्यासोबत लॉजवर चल...; आधी कॉलेजमध्ये रेकी, नंतर विद्यार्थिनींचा पाठलाग

Nandurbar Crime News: नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील नामांकित विकास महाविद्यालयात विद्यार्थिनींना छेडल्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
Nandurbar Crime News
Girl Student Stalkingsaam tv
Published On

सागर निकवाडे, साम प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात मुलींसोबत छेडछाड करण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. या प्रकरामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. इतकेच नाहीतर रोड रोमिओ कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थिनींची रेकी करत त्यांची छेड काढत आहेत. अशीच घटना शहादा शहरात असलेल्या नामांकित विकास कॉलेजमध्ये घडलीय.

दोन रोड रोमिओंनी कॉलेजमध्ये जात विद्यार्थिंनीची छेड काढली या छेड काढणाऱ्या रोड रोमिओंचा व्हिडिओ मुलींनी बनवलाय. मुलींनी आपला व्हिडिओ काढल्याचे समजातच. दोन्ही तरुणांनी तेथून पळ काढलाय. याबाबत विद्यार्थिनींनी प्राचार्यांकडे तक्रार केली. परंतु कॉलेजकडून कोणतीच पोलीस कारवाई करण्यात आली नाहीये. उलट विद्यार्थिनींवर दबाव कॉलेजकडून टाकण्यात आलाय. यामुळे महाविद्यालयात सुद्धा मुली सुरक्षित नसल्याचं बाब समोर आलीय.

दोन तरुणांनी विद्यार्थिनींचा कॉलेजपर्यंत पाठलाग केला. त्यानंतर कॉलेजच्या बाहेर मुलींना गाठत माझ्यासोबत लॉजवर चल असं म्हणत त्यांची छेड काढली. हा सर्व प्रकार महाविद्यालयातील सीसीटीव्हीत कैद झालाय. महाविद्यालयीन कामासाठी दोन विद्यार्थिनी ह्या महाविद्यालयात आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मागून दोन अज्ञात तरुण त्यांचा पाठलाग करत कॉलेजमध्ये आले. त्यानंतर एका बाकावर त्या विद्यार्थिनी बसल्या होत्या.

Nandurbar Crime News
Pune: दोघांनी ७ जणांना लुटलं अन् गळ्यावर कोयता ठेवून मुलीचं शोषण; पंढरीच्या वारीत नेमकं काय घडलं? आरोपीचं रेखाचित्र समोर

मुलींना बाकावर बसलेलं पाहिल्यानंतर रोड रोमिओ त्यांच्याजवळ आले. त्यांना हात लावला. चुकीचा स्पर्श करत असल्याचं लक्षात येताच त्या विद्यार्थ्यांनी घाबरल्या. त्यानंतर त्या तेथून महाविद्यालयाचा बाहेर निघून गेल्या. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. दरम्यान या दोन्ही विद्यार्थिनी स्कुटीवर बसून महाविद्यालयाबाहेर गेल्या. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ ते दोन अज्ञात तरूण ही त्यांचा पाठलाग करत एका सायबर सेंटरवर येऊन उभे राहिले. त्या तेथे विद्यार्थिनींही तेथे आल्या. त्यांनी या तरुणांना सायबर कॅफे चालू आहे का? असं विचारलं . त्यानंतर त्या दोन तरुणांना सांगितलं की, आम्हाला माहित नाही. तुम्ही विचारून घ्या.

त्यानंतर एका तरुणाने त्या विद्यार्थिनींची छेड काढली. अॅटीट्यूड दाखवू नको. तू माझ्यासोबत लॉजवर चल अशा अश्लील शब्दाचा वापर करत त्याने छेड काढली. अश्लील भाषेत बोलल्यानंतर विद्यार्थ्यांनी हिम्मत दाखवत त्यांचा व्हिडिओ काढला. त्यानंतर दोन्ही रोड रोमिओ तेथून पळून गेले. विकास महाविद्यालयाचा परिसरातच हा सर्व प्रकार घडल्यानंतर विद्यार्थ्यांनी याबाबत प्राचार्यांची भेट घेतली. यासंदर्भात तक्रार केलीय. मात्र महाविद्यालय यावर कुठलीही पोलीस कंप्लेंट करणार नसल्याचा स्पष्ट केलंय. उलट विद्यार्थिनींवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला यावरून महाविद्यालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. तर दुसरीकडे महाविद्यालयात विद्यार्थिनीचा सुरक्षेच्या प्रश्न देखील पुन्हा एकदा समोर आलेला आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com