Tuljapur News: बीडनंतर तुळजापूर हादरलं, सरपंचाला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Tuljapur: धाराशिवमधील तुळजापूरमध्ये मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर जीवे मारण्याची घटना घडली आहे. गाडीच्या काचा फोडून गाडीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Tuljapur crime
Tuljapur crimeSaam tv
Published On

Tuljapur News: संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर राज्यात कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. अशातच बीडच्या प्रकरणाची पुनरावृत्ती वाटावी अशी घटना धाराशिवमधील तुळजापूर तालुक्यात घडली आहे. तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. या हल्यात ते थोडक्यात बचावले. मध्यरात्री एकच्या सुमारास बारुळ गावाजवळ ही घटना घडली.

मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम मध्यरात्री गाडीने प्रवास करत होते. गाडीत त्यांचा भाऊ देखील होता. तेव्हा अचानक त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. दगडांनी काचा फोडून, गाडीत पेट्रोल टाकून गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला गेला. या हल्ल्यामध्ये नामदेव निकम थोडक्यात बचावले. पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, नामदेव निकम बारुळ गावातून मेसाई जवळगा गावच्या दिशेने जात होते. त्यांच्या गाडीच्या दोन्ही बाजूंनी दोन बाईक आल्या. बाईकवरचे लोक हॉर्न वाजवत होते. त्यांना पुढे जायचे आहे असं समजून नामदेव यांनी गाडीचा वेग कमी केला. लगेच त्या बाईकस्वारांनी डाव्या दरवाजाची काच दगडाने फोडली आणि पेट्रोलचे फुगे गाडीत टाकले.

'आम्ही गाडीचा वेग वाढवला. तेव्हा बाईकवरच्या गुंडांनी आमच्या गाडीच्या समोरच्या काचेवर अंडी फेकली. अंड्यांमुळे काच खराब झाल्याने आम्हाला गाडीचा वेग कमी करावा लागला. त्यानंतर बाईक जवळ आणत गुंडांनी गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला', असा घटनाक्रम नामदेव यांनी सांगितला. तसेच पवनचक्कीच्या वादावरुन हा हल्ला झाल्याचा संशय असल्याचेही त्यांनी सांगितले.

Tuljapur crime
Manmohan Singh: गावात नव्हती वीज, दिव्याखाली अभ्यास करुन झाले अर्थतज्ज्ञ; मनमोहन सिंग यांचा खडतर जीवन प्रवास

बीडच्या संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर आता धाराशिवमध्ये घडलेल्या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. या प्रकरणी पोलिस कारवाई करत गुन्हेगारांना कधी ताब्यात घेतील याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

Tuljapur crime
Manmohan Singh Funeral Rites Live Updates: मनमोहन सिंग अनंतात विलीन! शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com