
कल्याणनजीकच्या टिटवाळा परिसरातील विनयभंगाची धक्कादायक घटना घडली आहे. रिक्षा चालकाने घरात घुसून दोन शाळकरी मुलींचा विनयभंग केला. या घटनेमुळे टिटवाळ्यामध्ये खळबळ उडाली आहे. मुली आवडतात म्हणून या रिक्षा चालकाने हे लाजीरवाणं कृत्य केले. याप्रकरणी रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण तालुकातल्या टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. एका रिक्षा चालकाने घरात घुसून दोन शाळकरी मुलींचा विनयभंग केला. हेमंत पवार असं या आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर टिटवळ्यामध्ये खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
'मुली आवडतात म्हणून या रिक्षा चालकाने भरदिवसा घरात घुसून दोन्ही विद्यार्थिनीचा विनयभंग केला. घडल्या प्रकारामुळे या मुली घाबरल्या त्यांनी प्रतिकार करत आरडाओरडा केला. त्यामुळे रिक्षा चालकाने तिथून पळ काढला.
या प्रकरणी टिटवाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अवघ्या काही तासांत या रिक्षा चालकाला बेड्या ठोकल्या. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. टिटवाळा परिसरात सतत वाढत्या गुन्हेगारीमुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.