
विकास काटे, साम टीव्ही, प्रतिनिधी
ठाण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चित्रपटसृष्टीमध्ये स्ट्रगलर महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. तुला बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री बनवतो असे आमिष देत आरोपींना या महिलेला सिंगापूरला नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही ठाण्यातल्याम माजिवडा येथे राहते. ३४ वर्षीय महिला बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी स्ट्रगल करत आहे. या परिस्थितीचा फायदा उचलत आरोपींनी पीडितेला फसवले. तिला स्टार अभिनेत्री बनवून देण्याचे आमिष दाखवले आणि सिंगापूरला नेले. सिंगापूरला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले.
एका नामांकित पिझ्झा कंपनीच्या संचालकाचा या अत्याचार प्रकरणात सहभाग असल्याचे पीडितेने म्हटले आहे. आरोपींनी पीडितेला सिंगापूरला नेले. तिच्या शीतपेयामध्ये नशेचे औषध मिसळले आणि तिच्यावर अत्याचार केले. तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ बनवून तिला त्रास देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या व्हिडीओवरुन पीडितेला ब्लॅकमेल केले. शेवटी छळाला कंटाळून पीडित महिलेने गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला.
गुन्हा परदेशात झाल्याने पीडितेने न्यायालयात धाव घेत आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची अनुमती मिळवली. त्यानंतर ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात श्यामसुंदर भारतीय, पूजा सिंग, कवलजीत सिंग, मल्लिका सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास कापूरबावडी पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.