Telangana Crime : भयंकर! पोलीस उपनिरीक्षकानेच केला महिला कॉन्स्टेबलवर अत्याचार, तेलंगणा हादरलं

Police Sub Inspector Physically Abused Female Police Constable: तेलंगणामध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाने महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार केलाय. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आल्याची माहिती मिळतेय.
महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार
Telangana CrimeSaam Tv

एका पोलीस अधिकाऱ्यानेच महिला कॉन्स्टेबलवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना तेलंगणात घडली आहे. बंदुकीचा धाक दाखवत पोलीस अधिकाऱ्याने हे धक्कादायक कृत्य केल्याचं समोर आलंय. या आरोपी पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यावर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, तेलंगणा पोलीस विभागातील उपनिरीक्षकाला बुधवारी अटक करण्यात आली. एका महिला कॉन्स्टेबलवर बंदुकीच्या धाकावर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर (Physically Abused Female Police Constable) आहे. ही घटना १६ जून रोजी घडल्याचं सांगितलं जात आहे. जयशंकर भुलापल्ली जिल्ह्यातील ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, एका महिला कॉन्स्टेबलने ही तक्रार दाखल केली होती. तक्रारीमध्ये पीडितेने संबंधित पोलीस अधिकाऱ्याने बलात्कार करण्यापूर्वी तिला त्याच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने धमकावल्याचं म्हटलं (Police Sub Inspector Physically Abused) आहे. एवढेच नाही, तर या घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देखील त्याने पीडितेला दिली होती. पीडितेने यानंतर वरिष्ठांकडे तक्रार केली होती.

महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार
Vasai Crime News: माझ्या मुलीला मारलं... आता त्याचाही जीव पाहीजे, तरुणीच्या हत्येनंतर आईची संतप्त प्रतिक्रिया

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू (Telangana Crime News) केला. तपासात आरोपीचा गुन्हा स्पष्ट झाला. त्यानंतर आरोपी एसआयवर कारवाई करण्यात आली. आयजी एव्ही रंगनाथ यांनीही संबंधित आरोपीची पोलीस सेवेतून कायमची हकालपट्टी करण्याचे आदेश जारी केल्याची माहिती मिळत आहे. तसेच, त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत म्हणजेच आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात (Crime News) आलाय. या घटनेमुळे आता कायदा सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कायद्याचे रक्षण करणारेच भक्षक बनले, तर सर्वसामान्यांनी कुणाकडे मदत मागायची हा प्रश्न देखील या घटनेनंतर उपस्थित झाला आहे.

महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार
Palghar Crime News: चाललंय काय? वसईनंतर विरार हादरलं! जावयाने धारदार शस्त्राने केली सासूची हत्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com