Kala Jatheri Wedding: दिल्लीत ५ शार्प शूटर्सला अटक; काला जेठडीच्या लग्नाआधी गँगवारचा होता कट

Kala Jatheri Wedding: स्पेशल सेलचे पोलीस निरीक्षक संदीप डबास यांच्या टीमला गँगवारची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी कारवाई करत ५ शूटर्सना अटक केलीय. यामध्ये दोन कुख्यात गुन्हेगार आणि काला जठेडीच्या गँगमधील जुने गुंड आहेत.
Five Gangster Arrested
Five Gangster Arrested Saam Tv
Published On

Police Arrested Five Gangster In Delhi Dwarka Area:

हरियाणाच्या रोहतकमध्ये मोठा गँगवार करण्याचा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावलाय. लेडी डॉन मॅडम मिन्झ आणि कुख्यात गँगस्टर काला जठेडी यांच्या लग्नाआधी मोठा गँगवार होणार होता. दिल्लीतील स्पेशल सेलने दिल्लीतील द्वारका परिसरातून काला जठेडी टोळीच्या ५ शार्प शूटर्संना विदेशी शस्त्रांसह अटक केलीय. या शार्प शूटर्सकडून पीएक्स ३०, मेड इन चायना पिस्तूल, पी ब्रेटा मेड इन इटली पिस्तूल पाईंट ३२ , पिस्तूल आणि काही काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.(Latest News)

स्पेशल सेलचे पोलीस निरीक्षक संदीप डबास यांच्या टीमला गँगवारची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी कारवाई करत त्यांना अटक केलीय. डबास यांनी दिल्लीतील द्वारका परिसरातून या ५ शूटर्सना अटक केलीय. यामध्ये दोन कुख्यात गुन्हेगार आणि काला जठेडीच्या गँगमधील जुने गुंड आहेत. काला जठेडीच्या लग्नापूर्वी संदीप उर्फ ​​काला जठेडीच्या सांगण्यावरून हरियाणातील रोहतक येथे गँगवार केलं जाणार होते. या गँगवारचे कनेक्शन हरियाणा कारागृह आणि दिल्ली तिहार कारागृहाशी जुडले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अटक करण्यात आलेले मुख्य आरोपी राहुल बाबा आणि प्रवीण दादा अनिल छिपी काला जठेडीच्या टोळीसह हरियाणात दारूचे दुकाने चालवत होते. यावरून त्याचे प्रतिस्पर्धी टोळीमधी हिमांशू भाऊ नीरज बवानिया टोळीचा जवळचा सहकारी असलेल्या अजय याच्याशी भांडण झाले. अजय हा गुंड असलेल्या अमनचा मित्र आहे. तर अमन हिमांशू भाऊ नीरजच्या जवळचा आहे. दरम्यान यानंतर प्रतिस्पर्धी टोळीने नुकतेच राहुलच्या कार्यालयात गोळीबार केला होता.

त्यादरम्यान राहुल हा रोहतक येथील कारागृहात होता. त्यानंतर अमनने तुरुंगात असलेल्या त्याच्या टोळीमधील गुंडांच्या मदतीने राहुलवर जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर राहुल तुरुंगातून बाहेर येताच त्याने काला जठेडीशी संपर्क साधला. आणि अमनला मारण्याचा कट रचला. यासाठी या ५ शूटर्सची त्यांनी मदत घेतली.

Five Gangster Arrested
Wardha Crime News : वर्धा जिल्हा कारागृहात कैद्याची हवालदाराला मारहाण, गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com