Solapur Crime : मला जगण्याचा कंटाळा आला आहे, त्यामुळे...; अल्पवयीन विद्यार्थीनीने हॉस्टेलमध्ये आयुष्य संपवलं, सोलापुरात खळबळ

Solapur Minor Girl Commits Suicide in Hostel : सोलापुरातील एका प्रतिष्ठित महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Solapur a minor student ended her life in a college hostel
Solapur a minor student ended her life in a college hostelSaam Tv News
Published On

सोलापूर : बीडनंतर आता सोलापूरमधून एकामागून एक धक्कादायक बातम्या समोर येत आहे. प्रसिद्ध डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे खळबळ उडाली असून काल अजून एक घटना घडली. विजयपूर ते रायचूर पॅसेंजर एक्सप्रेसमधील एका चिमुकलीला बाहेरील अनोळखी माणसाने दगड मारल्याने त्यात या चिमुरडीचा मृत्यू झाला. त्यानंतर कालच नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेनं घरातच फेट्याच्या साहाय्याने लोखंडी पत्राच्या अँगलला गळफास लावत आपलं आयुष्य संपवलं. याचदरम्यान आता, चौथी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे, जिल्ह्यातील प्रतिष्ठित महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे.

सोलापुरातील एका प्रतिष्ठित महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अकरावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आपल्या आयुष्याची दोर कापली. संध्याकाळी सातच्या सुमारास रूममध्ये कोणी नसताना विद्यार्थिनीने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलंय. आत्महत्यापूर्वी या विद्यार्थिनीने चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती

Solapur a minor student ended her life in a college hostel
Pahalgam Terror Attack : पुण्यातल्या पर्यटकांना नावं विचारली, मग गोळीबार; कर्वेनगरमधील दोनजण जखमी

आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत काय लिहिलेलं?

‘मला जगण्याचा कंटाळा आला आहे, त्यामुळे मी आत्महत्या करतेय. यामध्ये कोणाचा हात नाही’ असं चिठ्ठीत लिहिलं असल्याचं आढळलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिन्याभरापूर्वी एका विद्यार्थ्याने याच महाविद्यालतील इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली होती. महिन्याभरात ही दुसरी आत्महत्येची घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलीस महाविद्यालयात दाखल झाले असून मृतदेह हे शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.

Solapur a minor student ended her life in a college hostel
Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील २ पर्यटकांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com