Crime: शेतामध्ये हत्येचा थरार! नवऱ्याने बायकोला संपवलं; धारदार शस्त्राने १२ वेळा वार

Parbhani Crime News: परभणीमध्ये नवऱ्याने बायकोची भयंकर हत्या केली. शेतामध्ये गेलेल्या बायकोवर धारदार शस्त्राने वार करत तिला जागीच संपवले. बायकोच्या हत्येनंतर आरोपी फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
Crime: शेतामध्ये हत्येचा थरार! नवऱ्याने बायकोला संपवलं; धारदार शस्त्राने १२ वेळा वार
Parbhani Crime News Saam Tv
Published On

Summary -

  • परभणीच्या जिंतूर तालुक्यात नवऱ्याने पत्नीची हत्या केली.

  • महिलेवर धारदार शस्त्राने तब्बल १२ वेळा वार करण्यात आले.

  • गंभीर जखमी झालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

  • आरोपी विजय राठोड फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

परभणीमध्ये नवऱ्याने बायकोची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतामध्ये बायकोला गाठून आरोपीने तिच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. आरोपीने महिलेच्या पोट आणि छातीवर तब्बल १२ वेळा वार केले. या हल्लयात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा अधिक रक्तस्राव झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Crime: शेतामध्ये हत्येचा थरार! नवऱ्याने बायकोला संपवलं; धारदार शस्त्राने १२ वेळा वार
Cyber Crime : CBI अधिकारी बोलतोय..., गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवली, आजोंबांना १ कोटींचा गंडा

मिळालेल्या माहितीनुसार, परभणीच्या जिंतूर तालुक्यातील सोनपूर तांडा येथे ही धक्कादायक घटना घडली. सोनपूर तांडा येथील शेत शिवारात गुरूवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. नवऱ्याने आपल्या बायकोची तीक्ष्ण हत्याराने हत्या केली. तिच्या छातीवर आणि पोटावर १२ वेळा वार करण्यात आले. हल्ला इतका भयंकर होता की महिला गंभीर जखमी झाली.

Crime: शेतामध्ये हत्येचा थरार! नवऱ्याने बायकोला संपवलं; धारदार शस्त्राने १२ वेळा वार
Crime News: भयंकर! तांत्रिकानं आजोबाचं डोकं फिरवलं; चार दिशेला फेकले नातवाच्या शरीराचे तुकडे

या हल्ल्यात गंभीर झालेल्या महिलेला स्थानिक नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी जिंतूरच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये नेले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी या महिलेला मृत घोषित केले. बायकोची हत्या करून तिचा पती विजय राठोड फरार झाला. विद्या विजय राठोड (३२ वर्षे) असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी परभणीच्या जिंतूर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. या घटनेमुळे परभणीमध्ये खळबळ उडाली.

Crime: शेतामध्ये हत्येचा थरार! नवऱ्याने बायकोला संपवलं; धारदार शस्त्राने १२ वेळा वार
Satara Crime: साताऱ्यात चोरांचा सुळसुळाट; कोयत्याचा धाक दाखवत मंगळसूत्र हिसकावलं|VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com