शरद मोहोळ हत्या प्रकरणामुळे संपूर्ण पुणे शहर हादरून गेलं आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून दररोज नवीन माहिती समोर येतेय. आतापर्यंत एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आलीये. यातील २ जण वकील आहेत. या वकीलांना न्यायालयात आपली बाजू मांडताना अश्रू अनावर झालेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मोहोळ खून प्रकरणात ७ तरुणांसह २ वकिलांना पोलिसांनी अटक केलीये. शरद मोहोळ खून प्रकरणामधील आरोपींना काल न्यायालयात हजर केले होते. यावेळी आरोपी दोन वकिलांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ॲड रवींद्र पवार आणि ॲड संजय उड्डाण अशी वकिलांची नावे आहेत.
वकिलास न्यायालयातच अश्रू अनावर
"आम्हाला आरोपींचा फोन आला की, त्यांनी खून केला असून, त्यांना सरेंडर व्हायचे आहे. आम्हीही त्यांना तोच सल्ला देत, त्याची माहिती पोलिसांना फोनद्वारे कळविली" असे या वकिलांनी न्यायलायात सांगितले.
"आरोपींना पकडण्यासाठी आलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनाही आम्ही तेच सांगितले. पण पोलिसांनी आमचे ऐकले नाही.", अशा शब्दात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका वकिलाने आपली बाजू मांडली.
"आम्ही १५ वर्ष वकीली व्यावसायात आहोत, आम्ही काहीही केले नाही", असे सांगताना दुसऱ्या वकिलास न्यायालयातच अश्रू अनावर झाले होते.
CCTV फुटेज पोलिसांच्या हाती
पुण्यात शरद मोहोळ कोथरुडमधील सुतारदरा परिसरातील आपल्या घरातून बाहेर निघाला होता. त्यावेळी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेचं CCTV फुटेज देखील समोर आलं आहे. व्हिडीओमध्ये शरद मोहोळवर कशा पद्धतीने गोळ्या झाडण्यात आल्या हे स्पष्ट दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.