Husband Attack On Wife: भयंकर! कॉलेजला जाणाऱ्या बायकोवर नवऱ्याचा चाकूहल्ला, सांगलीत घटनेचा थरार

Husband Attack On Wife In Collage Area: सांगलीमध्ये नवऱ्याने बायकोवर महाविद्यालय परिसरातच चाकूहल्ला केल्याची घटना घडलीय. या हल्ल्यानंतर आरोपी फरार आहे.
बायकोवर नवऱ्याचा चाकूहल्ला
Husband Attack On Wife Saam Tv
Published On

विजय पाटील, साम टीव्ही सांगली

सांगलीत महाविद्यालयात शिकणाऱ्या एका महिलेवर तिच्या पतीनेच चाकूहल्ला केलाय. या हल्ल्यामध्ये महिला गंभीर जखमी झालीय, तर तिचा नवरा घटनेनंतर फरार झाला आहे. आज सकाळी ७ ऑगस्ट रोजी ही घटना सांगलीतील एका महाविद्यालयासमोर घडली आहे. या महिलेच्या नवऱ्याचा शोध सुरू असल्याची माहिती मिळत आहे. आपण या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेवू या.

नेमकं काय घडलं?

प्रांजल काळे, असं चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे. ती सांगलीतील कॉलेज कॉर्नर येथील एका महाविद्यालय शिकते. तिच्यावर तिच्या नवऱ्यानेच आज सकाळी महाविद्यालयासमोर चाकूहल्ला (Sangli Crime News) केलाय. या हल्ल्यानंतर हल्लेखोराने पलायन केलंय. तर घटनेत प्रांजल गंभीर जखमी झालीय, त्यामुळे तिला उपचारासाठी तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. तिच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

कॉलेजला जाणाऱ्या बायकोवर नवऱ्याचा चाकूहल्ला

प्रांजल काळेचा सहा महिन्यापूर्वी संग्राम शिंदे याच्याशी प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरु होते. यापूर्वीही संग्रामविरुध्द तिने तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आज ती कॉलेज कॉर्नर येथील एका कॉलेजमध्ये नेहमीप्रमाणे (Husband Attack On Wife) आली होती. त्यावेळी संग्रामने कॉलेजच्या बाहेरच तिच्यावर चाकूने वार केला. या हल्ल्यात प्रांजल जखमी झालीय. तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बायकोवर नवऱ्याचा चाकूहल्ला
Dombivli Crime: चोरीसाठी घरगडी झाला, मेहुण्यासोबत घरावर डल्ला मारत १५ लाख लंपास, डोंबिवली पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश केला

हल्ल्यानंतर आरोपी फरार

हल्ल्यानंतर पती संग्राम याने घटनास्थळावरून पलायन (Sangli News) केलंय. घटनेनंतर विश्रामबाग आणि शहर पोलिसांनी सुद्धा घटनस्थळी घाव घेतली. अद्याप याबाबत पोलिसात नोंद नाही. प्रांजल आणि संग्रामचा सहा महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झाल्याची माहिती मिळतेय. हा हल्ल्यामुळे महिला घाबरलेली आहे. महाविद्यालयात देखील घटनेनंतर मोठा गोंधळ उडाला (Crime News) होता. सध्या तेथील वातावरण शांत झालंय. तर घटनेमुळे सांगली शहरात संताप व्यक्त केला जात आहे.

बायकोवर नवऱ्याचा चाकूहल्ला
Crime News : प्रेमाला विरोध केल्याने तरुणी संतापली, प्रियकराच्या मदतीने जन्मदात्या आईलाच संपवलं, भयानक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com