- सिद्धेश म्हात्रे
40 हजार रुपयांची लाच घेताना पनवेल तहसीलदार कार्यालयातील (panvel tashil office) महसूल सहाय्यक किरण गोरे (kiran gore) या अधिकाऱ्याला नवी मुंबई लाचलुचपत विभागाने (navi mumbai anti corruption bureau) रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पनवेल तहसील कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. (Maharashtra News)
तक्रारदार यांची गिरवले येथे शेतजमीन आहे. यातील सर्व्हे नंबर 44 आणि 94/2 मधील त्रुटी दूर करण्यासाठी त्यांनी पनवेल तहसील कार्यालयात जानेवारी महिन्यात प्रकरण दाखल केले हाेते.
या कार्यालयाने तीन महिने तक्रारदार यांच्या अर्जावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे तक्रारदाराने महसूल सहाय्यक किरण गोरे यांची भेट घेतली. गाेरेंना त्यांना लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने एसीबी कार्यालय गाठले. एसीबीने तक्रारीची शहनिशा करुन गाेरेंवर सापळा रचला. त्यात ते सापडले. त्यांच्यावर कायदेशिर कारवाई केल्याचे एसीबीने नमूद केले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.