Pune Crime: पुणे स्टेशनवर जबरी चोरीचा थरार! पैसे न दिल्याने पोटात भोसकला चाकू

Pune Crime: पैसे देण्यास नकार दिल्याने एका तरुणाच्या पोटात चाकूने वार करण्यात आले. बंडगार्डन पोलिसांनी तीन दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Pune Crime
Robbery at Pune railway station: Youth stabbed after refusing money, police file case.Saam tv
Published On
Summary
  • पुणे रेल्वे स्टेशनवर तिघांनी तरुणाला पैसे मागितले.

  • पैसे न दिल्याने तरुणावर लाथाबुक्क्या आणि चाकू हल्ला.

  • पीडित तरुण नांदेडवरून पुण्यात आला होता.

पुणे रेल्वे स्टेशनवर जबरी चोरीचा प्रकार घडलाय. नांदेडवरुन रेल्वेने पुण्यात आलेल्या तरुणावर चोरट्यांनी चाकू हल्ला केल्याची घटना घडलीय. स्टेशनवर आलेल्या तरुणाकडे तिघांनी धमकावून पैसे मागितले. परंतु पैसे देण्यास तरुणाने नकार दिला. त्यावरून त्या तिघांनी तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्यावर पोटात चाकूने वार केलेत. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी तीन चोरट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

संतोष अमित जाधव ( २२ वर्ष ) यांनी पोलिसात फिर्याद दिलीय. हा प्रकार पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर असलेल्या रेल्वे पार्सल विभागा पुढे असलेल्या व्हीआयपी साईडिंगच्या ठिकाणी पहाटे पाचच्या सुमारास हल्ल्याची घटना घडलीय. फिर्यादी संतोष जाधव हा कामानिमित्त पुण्यात आला होता. रेल्वे स्टेशवर उतरल्यानंतर तो बाहेर जात असताना तिघांनी त्यांना वाटेत अडवलं. त्याच्याकडे पैशांची मागणी केली.

Pune Crime
Shocking ! भेटायला बोलवून मुलाचे कपडे उतरवले; नंतर बनवला अश्लील व्हिडिओ मग..., घटना वाचून उडेल थरकाप

त्याने पैसे देण्यास नकार देताच त्या तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याच्या पोटावर चाकूने वार केले. संतोष जाधव याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक खेडकर पुढील तपास करत आहेत.

Pune Crime
Firing: अभिनेत्री दिशा पटानीच्या घराबाहेर गोळीबार का झाला? धक्कादायक माहिती आली समोर

पुणे पोलिसांची मोठी कारवाई

पुणे ग्रामीण पोलिसांनी धाडसी कारवाई करत महिलांचे आणि अल्पवयीन मुलींचे अपहरण करणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगार टोळीचा म्होरक्याला अटक केलीय. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक राज्यात गुन्हे दाखल असलेला आंतरराज्य गुन्हेगार टोळीचा म्होरक्या बेताब उर्फ शिवम उर्फ शुभम आनंद पवार याला पोलिसांनी अटक केलीय.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कर्नाटकातील कलबुर्गी येथे लपल्याचे समजले. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक कलबुर्गी येथे गेले व मालखेड पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com