Pune Crime: माझी इच्छा पूर्ण कर..; डेपो मॅनेजरची PMPLच्या महिला कंडक्टरकडे शरीर सुखाची मागणी

PMPL Depo Manager Misbehave With Lady Conductor: डेपो मॅनेजर पीएमपीएलच्या महिला वाहकाकडे शरीर सुखाची मागणी करत होता. याप्रकरणी महिला वाहकाने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केलीय.
PMPL
Depo Manager Misbehave With Lady Conductor Saam Tv
Published On

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

एका डेपो मॅनेजरने पीएमपीएलच्या महिला कंडक्टरकडे शरीर सुखाची मागणी केल्याची घटना पुण्यात घडलीय. डेपो मॅनेजरच्या जाचाला कंटाळून पीएमपीएलच्या महिला वाहकाने कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, डेपो मॅनेजर शरीर सुखासाठी पीडितेला त्रास होत होता. वाहक आणि एका चालकाच्या मदतीने डेपो मॅनेजर पीडितेला त्रास देत होता.

विशेष म्हणजे याप्रकरणी पीडिता महिला कंडक्टरने बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दाखल केलाय. महिला आयोगाकडेही तक्रार दाखल केलीय. मात्र डेपो मॅनेजरविरोधात कोणताच गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये. यामुळे महिला कंडक्टरने मॅनेजरच्या कार्यालयात जात अंगावर पेट्रोल टाकून जीव देण्याचा प्रयत्न केला. संजय कुसाळकर, असं त्रास देणाऱ्या डेपो मॅनेजरचं नाव आहे. महिला वाहकाचा पाठलाग करणाऱ्या आणि संजय कुसाळकरविरुद्ध समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

PMPL
Crime News: संतापजनक! १८ अल्पवयीन मुलांचं सैतानी कृत्य, तिघींचं अपहरण आणि सामूहिक बलात्कार

याप्रकरणी मिळालेल्या अतिरिक्त माहितीनुसार, संजय कुसाळकरने यापूर्वीही महिलेला त्रास दिलाय. याप्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. पीडितेला त्रास देण्यासाठी डेपो मॅनेजरला एक वाहक आणि चालक मदत करत होता. वाहक सुनील भालेकर याने मानसिक त्रास दिला. भालेकर हा महिलेला फोटो व्हायरल करण्याचा त्रास द्यायचा आणि पाठलाग करायचा. सुधीर राठेड हा कॉल करून शिव्या देत होता.

PMPL
Chhatrapati SambhajiNagar: भररस्त्यात तरुणीची दादागिरी; वयस्कर व्यक्तीला मारहाण,भांडण सोडवणाऱ्यांनाही हासाडल्या शिव्या

दरम्यान महिला वाहकाने महिला आयोग आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. वरिष्ठांकडेही याप्रकरणी वेळोवेळी तक्रार दाखल केलीय. मात्र त्याची दखल घेत जात नसल्याने मनीषा शेकडे यांनी संजय कुसाळकर यांच्या केबिनमध्ये असलेलं पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे पीएमपीएलच्या वरिष्ठांकडे डेपो मॅनेजरविरोधात तक्रार केल्यानंतर मॅनेजरनं महिला कर्मचारीला निलंबित केलंय.

महिला वाहकाने दिलेल्या तक्रारीनुसार, डेपो मॅनेजर संजय राजाराम कुसाळकर हा त्यांना अनेक वर्षांपासून त्रास देत होता. ड्युटीवर असताना डेपो मॅनेजर वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देत होता. कधी अवघड ड्युटी लावणे, उशिरा सुटणाऱ्या गाड्या देणे, इतकेच नाही तर चेहऱ्यावर रुमाल बांधून कुसाळकर हा त्यांचा पाठलाग देखील करायचा. पाठलाग करत थांबवून महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करायचा. माझी इच्छा पुर्ण केली तर त्रास होणार नाही. लोडच्या गाड्या करायची गरज नाही, असं डेपो मॅनेजर सांगायचं असं या महिला कर्मचाऱ्याने आपल्या तक्रारीत म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com