Pune Crime: लवस्टोरीचा भयंकर शेवट! घरच्यांचा लग्नाला विरोध, प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या; पुणे हादरलं

Pune Breaking News: नातेवाईकांनी प्रेमाला विरोध केल्याने प्रेयसीची हत्या करुन प्रियकराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर पुणे शहरातून समोर आली आहे. या धक्कादायक घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
 Pune Crime: लवस्टोरीचा भयंकर शेवट! घरच्यांचा लग्नाला विरोध, प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या; पुणे हादरलं
Pune Crime NewsSaam TV

अक्षय बडवे| पुणे, ता. ६ जून २०२४

पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. पुण्यात खून, मारामाऱ्या, हल्ल्यासारख्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशातच नातेवाईकांनी प्रेमाला विरोध केल्याने प्रेयसीचा खून करुन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे. पुण्यातील हडपसर भागात घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नातेवाईकांनी लग्नाला विरोध केल्याने आधी प्रेयसीची हत्या करुन प्रियकराने स्वतः आत्महत्या केल्याची घटना पुणे शहरातील हडपसर भागात घडली. मोनिका कैलास खंडारे असे खून झालेल्या तरुणीचे नाव तर आकाश अरुण खंडारे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

मोनिका आणि आकाश मूळचे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्याचे राहणारे आहेत. दोघे नातेवाईक असून त्यांचे प्रेमसंबंध होते. मोनिका आणि आकाशच्या प्रेमसंबंधाला कुटुंबीयांचा विरोध होता. आकाश शेती करायचा तर मोनिका नोकरी करत होती. दोघे ही गावाहून पुण्यात पळून आले होते.

 Pune Crime: लवस्टोरीचा भयंकर शेवट! घरच्यांचा लग्नाला विरोध, प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या; पुणे हादरलं
Sanjay Raut News: राजीनामा कशाला देताय, जनतेनेच तुम्हाला घरी बसवलंय; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

शहरातील स्पॉटलाईट हॉटेलमध्ये दोघांनीही खोली भाड्याने घेतली होती. १३ मे रोजी मध्यरात्री आकाशने मोनिकाचा चादरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने खोलीतील पंख्याला चादर बांधून गळफास घेतला. याबाबतची माहिती हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलीस तपासात हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे. या भयंकर घटनेने पुणे शहर हादरुन गेले आहे.

 Pune Crime: लवस्टोरीचा भयंकर शेवट! घरच्यांचा लग्नाला विरोध, प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या; पुणे हादरलं
Mumbai News: खळबळजनक! विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; मुंबई विमानतळावरील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com