Pune News : पुणे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीचा मृत्यू; सलग ५ ठिकाणी झाला होता ब्लास्ट

Pune Bomb Blast Accused Dies : त्यातील पाच बॉम्ब काही मिनिटांच्या अंतराने फुटत राहिले. यातील एक बॉम्ब फुटला नव्हता. तो बॉम्ब शोध व नाशक पथकाने शोधून काढला आणि निकामी केला होता.
Pune News
Pune NewsSaam TV

Pune News :

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आलीये. पुण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी फिरोज उर्फ हमजा अब्दुल सय्यदचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या जे.जे रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. सय्यदला कर्करोग होता. गेल्या महिन्याभरापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. अशात रविवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला.

Pune News
Pune Crime News : पुण्यात दुचाकी चाेरणा-या बाणेर, वाकड, थेरगावातील युवकांना अटक, 11 वाहनांसह रिक्षा जप्त

सलग ५ बॉम्बस्फोट

पुण्याच्या जंगली महाराज रस्त्यावर १ ऑगस्ट २०१२ रोजी सलग पाच साखळी बॉम्बस्फोट झाले होते. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हाती. मात्र एक व्यक्ती जखमी झाला होता. आरोपींनी डेक्कन परिसरात एकूण सहा ठिकाणी बॉम्ब ठेवले होते. त्यातील पाच बॉम्ब काही मिनिटांच्या अंतराने फुटत राहिले. यातील एक बॉम्ब फुटला नव्हता. तो बॉम्ब शोध व नाशक पथकाने शोधून काढला आणि निकामी केला होता.

एकूण ८ जणांना आटक

सदर घटनेनंतर पोलिसांनी आपली तपासाची सूत्र वेगाने फिरवली. या प्रकरणी एकूण ८ जणांना अटक करण्यात आली होती. या आठ जणांमध्ये रविवारी मृत पावलेला आरोपी सय्यदचाही समावेश होता. या गुन्ह्याचा अधिक तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला होता. आठही आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

फिरोज सय्यदवरील आरोप

फिरोज सय्यद लष्कर परिसरात टेलरिंगचा व्यवसाय करायचा. तो ‘लष्कर-ए-तय्यबा’चा दहशतवादी फैय्याज कागझीच्या संपर्कात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलिसांनी कासारवाडी येथील त्याच्या भाड्याच्या घरात धाड टाकली त्यावेळी तेथे स्फोटके, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जमविल्याचे आढळून आले होते.

जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या बॉम्बस्फोटात बॉम्ब ठेवण्यातही त्याचा प्रत्यक्ष हात असल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. सदर प्रकरणी अटक झाल्यापासून फिरोज ऑर्थर रोड कारागृहात होता. तेथेच त्याच्या पोटात दुखू लागल्याने गेल्या महिन्यापसून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी मृत्यूनंतर त्याचे शव कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आलेय.

Pune News
Pune Viral Video: बापरे! नव्या कोऱ्या बुलेटने पेट घेतला, भररस्त्यात जळून खाक; पुण्यातील थरारक VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com