Pune Viral Video: बापरे! नव्या कोऱ्या बुलेटने पेट घेतला, भररस्त्यात जळून खाक; पुण्यातील थरारक VIDEO

Pune Bullet Viral Video: नव्या कोऱ्या बुलेटला आग लागून मालकाच्या डोळ्यादेखत गाडी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Pune Bullet Viral Video:
Pune Bullet Viral Video: Saamtv

Pune Bullet Caught Fire Viral Video News:

तरुणाईमध्ये असलेले बुलेट प्रेम काही वेगळे सांगायची गरज नाही. रॉयल लूक अन् आवाजामुळे तरुणाईमध्ये या गाडीची प्रचंड क्रेझ आहे. अशातच पुण्यामधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून नव्या कोऱ्या बुलेटला आग लागून मालकाच्या डोळ्यादेखत गाडी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या राज्यभरात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. वाढत्या उन्हाचा परिणाम इलेक्ट्रिक स्कुटी किंवा बाईकवर होत असून अनेक ठिकाणी धावत्या गाड्यांनी पेट घेतल्याच्या घटना समोर येत आहेत. मात्र पुण्यामध्ये भरचौकात एका बुलेटने अचानक पेट घेतल्याचा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ (Viral Video) हा पुण्यातील (Pune News) केशवनगरमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. नव्या कोऱ्या बुलेटने पेट घेतल्यामुळे रस्त्यावरील वाहन चालकांनीही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Pune Bullet Viral Video:
Shirpur Crime News : पैसे देण्यास नकार दिल्याने पत्नीची हत्या; पतीसह सासरा ताब्यात

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बुलेटने पेट घेऊन गाडीची टाकी फुटल्या दिसत आहे. गाडीने पेट घेतल्यानंतर बुलेटचा मालक अन् काही लोक टँकरने पाणी मारुन आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. गाडीने नेमका पेट कशामुळे घेतला याचे कारण समोर आले नाही. मात्र या घटनेवर प्रतिक्रिया देताना नेटकऱ्यांनी वाहन चालकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Bullet Viral Video:
Pimpri Chinchwad News : स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय; पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांची कारवाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com