
संजय गडदे, साम टिव्ही
सिंधुदुर्ग : मालवणी पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करत दोन व्यक्तींना अटक केली असून त्याच्याकडून 'ओनेरेक्स ब्रँडच्या कोडीन फॉस्फेट' युक्त कफ सिरप असलेल्या तब्बल ७१० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. ओनेरेक्स कफ सिरप' असलेल्या या ७१० बाटल्यांची एकूण किंमत सुमारे ३,५१५००/- रुपये इतकी आहे.ही कारवाई एनडीपीएस कायद्यांतर्गत करण्यात आली. नावेद अब्दुल हमीद बटाटावाला आणि रिजवान वकील अन्सारी असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून मालवणी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पो.उप.नि. दीपक हिंडे व निगराणी पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, नावेद अब्दुल हमीद बटाटावाला आणि रिजवान वकील अन्सारी या दोन व्यक्ती मालाड मार्वे रोड येथील म वा देसाई मैदानाजवळील वडापावच्या दुकानाजवळ अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आले आहेत. हिंगे यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास परिसरात गस्त वाढवून दोन्ही संशयतांना ताब्यात घेतले.
दोघांचीही झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे कोडेन फॉस्फेट मिश्रित अमली पदार्थ असलेल्या कप सिरपच्या 'विंग्ज १०० एमएल ओनेरेक्स कफ सिरप' या ७१० बाटल्या आढळून आल्या या बाटल्यांची एमआरपी किंमत ५०० रुपये इतकी असल्याचे दिसून आले या सर्व बातम्यांची एकूण किंमत सुमारे ३,५१५००/- रुपये इतकी आहे. तपासा दरम्यान या दोघांकडूनही या अमली पदार्थांचा वापर करून युवकांना व्यसनाधीन करण्याचा आणि गैरवापर करण्याचा उद्देश असल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाई मध्ये परिमंडळ ११चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी फुलमाळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक हिंडे व त्यांच्या पथकाने मोलाची भूमिका बजावली. ही कारवाई म्हणजे अमली पदार्थ विरोधातील लढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. मालवणी पोलिसांनी यासंदर्भात पुढील तपास सुरू केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.