
उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये भयंकर घटना घडली. एका आईने बाळाची हत्या करून त्याला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिलं. मेहुण्याच्या प्रेमात वेडी झालेल्या या महिलेने आपल्या बाळाची जगात येण्यापूर्वीच हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी महिलेसह तिच्या प्रियकराला म्हणजे मेहुण्याला अटक केली. ही घटना २४ जून रोजी शहरातील रूरकी चुंगी भागात घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ जून रोजी मुजफ्फरनगर पोलिसांना एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये मृत स्त्री अर्भक सापडले होते. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना ही माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भकाचा मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला होता. अर्भकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला होता. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे तपास सुरू केला असता त्यांना दोन संशयितांची माहिती मिळाली. त्याआधारेच पोलिसांनी आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली.
४ जुलै रोजी बामनेहडी पुलाजवळ मु्ख्य आरोपी अभिषेक आणि त्याची साथीदार प्रिया यांना पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेला आरोपी अभिषेक २७ वर्षांचा तर प्रिया १९ वर्षांची असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस या दोन्ही आरोपींची कसून चौकशी करत आहेत. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली पण हे कृत्य करण्यामागचे नेमके कारण काय याचे देखील कारण त्यांनी पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, प्रियाचे मेहुणा अभिषेकसोबत प्रेमसंबंध होते. अनैतिक संबंधातून प्रिया गर्भवती राहिली. ती ४ महिन्यांची गर्भवती होती. तिने अभिषेकला सांगितले की तुझे बाळ माझ्या पोटात वाढत आहे. त्यानंतर प्रिया आणि अभिषेकने गर्भाशयात वाढणाऱ्या ४ महिन्यांच्या गर्भाला मारण्याचा कट रचला. अभिषेकने प्रियाला गर्भपाताचे औषध देऊन गर्भाशयात वाढत असलेल्या बाळाची हत्या केली. त्यानंतर या दोघांनी हे मृत स्त्री अर्भक रुरकी चुंगीजवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिले. पोलिसांनी या दोघांना अटक केली असून त्यांची रवानगी तुरूंगात केली जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.