Crime: औरंगाबादमध्ये नेपाळी महिलेवर सामूहिक बलात्कार, पीडितेच्या हातात २०० रुपये ठेवत आरोपींनी काढला पळ

Bihar Crime: बिहारच्या औरंगाबादमध्ये नेपाळी महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी तिघांना अटक केली.
Crime: औरंगाबादमध्ये नेपाळी महिलेवर सामूहिक बलात्कार, पीडितेच्या हातात २०० रुपये ठेवत आरोपींनी काढला पळ
Bihar Crime Saam Tv
Published On
  • बिहारच्या औरंगाबादमध्ये विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार

  • नेपाळी महिलेवर ३ जणांकडून अत्याचार

  • पोलिसांनी तिन्ही आरोपींना केली अटक

बिहारमध्ये नेपाळी महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. औरंगाबाद जिल्हा मुख्यालयात पीडित महिला नवऱ्यासोबत राहते. ही घटना मंगळवारी इरिगेशन कॉलनीजवळील एका जीर्ण इमारतीमध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. तर एका १५ वर्षीय मुलाला ताब्यात घेतलं. राकेश कुमार, अभिषेक कुमार अशी आरोपींची नावं आहेत. एक आरोपी अल्पवयीन असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी पीडत महिलेची वैद्यकीय तपासणी केली.

पीडित महिला ही नेपाळची रहिवासी आहे. तीन वर्षांपूर्वी तिने दुसऱ्यांदा लग्न केले होते. तिच्या पहिल्या नवऱ्याचे निधन झाले होते. तिला पहिल्या नवऱ्यापासून ४ मुलं आहेत. तिचा नवरा बाजारात चहा विक्री करतो आणि मुलांची काळजी घेतो. २१ जुलै रोजी सांयकाळी ५ वाजता पीडित महिला घराबाहेर उभी होती. त्यावेळी त्याच परिसरात राहणारा एक अल्पवयीन मुलगा तिथे आला. त्याने तिच्या मुलांना गाडीत बसवून फिरवून आणतो असे सांगून घेऊन गेला. त्यावेळी दुसरे दोन आरोपी आधीच गाडीमध्ये बसले होते.

Crime: औरंगाबादमध्ये नेपाळी महिलेवर सामूहिक बलात्कार, पीडितेच्या हातात २०० रुपये ठेवत आरोपींनी काढला पळ
Crime: १३ वर्षीय भाचीचं अपरहण, शेतात नेऊन मामाकडून बलात्कार; नंतर गळा दाबून संपवलं

आरोपी सोन कॉलनीतील शिव मंदिराजवळ मासे बाजाराजवळील एका जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये महिलेला घेऊन गेले आणि तिथे त्यांनी पीडित महिलेवर आळीपाळीने बलात्कार केला. त्यावेळी आरोपींनी पीडित महिलेच्या मुलांना मोबाइल देत गप्प केले. महिलेवर बलात्कार केल्यानंतर आरोपींनी तिला सोडून पळ काढला. यावेळी महिलेच्या हातात त्यांनी १०० रुपये ठेवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत काही तासांत त्यांना अटक केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Crime: औरंगाबादमध्ये नेपाळी महिलेवर सामूहिक बलात्कार, पीडितेच्या हातात २०० रुपये ठेवत आरोपींनी काढला पळ
Crime: बायको अन् २ मुलांची हत्या, नंतर तरुणाने धावत्या ट्रेनसमोर उडी मारत संपवलं आयुष्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com