Navi Mumbai Crime : १२ हजार पगार, वाजवी पगारात खर्च भागेना; नवी मुंबईतल्या तरुणीच्या आत्महत्येचं कारण समोर

Navi Mumbai News : नंदिनीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यामुळे नंदिनीने कानपूर सोडून नवी मुंबई गाठली. त्यानंतर ती नवी मुंबईतील ऐरोलीतील सेक्टर १ मध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहू लागली.
 Airoli Nandini Suicide Case
Airoli Nandini Suicide CaseSaam Tv News
Published On

नवी मुंबई : कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी केवळ राज्यातूनच नाही, तर परराज्यातून लोक मुंबईत येत असतात. उत्तर प्रदेशातील कानपूरहून एक तरुणी मुंबईमध्ये नोकरीसाठी आली होती. ती एका कंपनीत कर्मचारी म्हणून रुजू झाली. पण तिचा अपेक्षाभंग झाल्यानं तिने आत्महत्या केली. तिचं नाव नंदिनी (वय २२) असं आहे. तिनं आर्थिक चणचणीतूनच आपलं जीवन संपवलं. ही घटना नवी मुंबईतील ऐरोलीत घडली आहे.

आर्थिक चणचणीतून केली आत्महत्या

नंदिनीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यामुळे नंदिनीने कानपूर सोडून नवी मुंबई गाठली. त्यानंतर ती नवी मुंबईतील ऐरोलीतील सेक्टर १ मध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहू लागली. अशावेळी घरभाडे आणि आई वडिलांच्या आजारपणाचा खर्च झेपत नसल्यानं तिनं आत्महत्या केली. १२ हजार वेतनावर ती एका कंपनीत नोकरी करायची. मात्र, या वाजवी पगारात तिचा सर्व खर्च भागत नव्हता.

 Airoli Nandini Suicide Case
Shirdi Murder Case : शिर्डी हादरली! वाढदिवसाच्या पार्टीसाठी अपहरण केलं, चाकूने सपासप वार करत खून केला

तिचे सहकारी गावी गेल्यानं काही दिवसांपासून ती एकटीच राहू लागली होती. तिच्या स्वभावाने तिची शेजाऱ्यांशी चांगली मैत्री झाली होती. शनिवारपर्यंत तिने कोणाशीही संपर्क केला नाही. घराचा दरवाजा आतून बंद असल्याचं पाहून शेजाऱ्यांनी रविवारी दुपारी बनावट चावीचा वापर करत बंद असलेला दरवाजा उघडला. अशावेळी तिचा गळफास घेतलेला मृतदेह दिसून आला.

डायरीत सुसाईड नोट

अशावेळी तिने एका डायरीत मनातली सल व्यक्त करत लिहिली आणि आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने डायरीत लिहिलं की, मिळणाऱ्या पगारातून काही भागत नसल्याची खंत तिने व्यक्त केली आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी तपास केला आहे.

महिला पोलीस निरीक्षक वृषाली पवार यांनी सांगितलं की, तरुणीने आर्थिक अडचणीतूनच पुन्हा कानपूरला जाण्याचा निर्णय घेतला होता, असं तिने मैत्रिणीला सांगितलं होतं. मुंबईत येऊन तिचा अपेक्षाभंग झाल्यानं तिने आत्महत्या केली. याबबत तिच्या कुटुंबियांना कळवलं असून यातील पुढील अधिक तपास सुरु आहे.

 Airoli Nandini Suicide Case
Shocking : ऑनलाइन जुगारामुळे कर्जबाजारी झाला, २ वर्षांच्या मुलासह बायकोला विष दिलं, मग स्वत: टोकाचे पाऊल उचललं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com