Nashik Crime : पोरगा दोन दिवसांपासून बेपत्ता, आई-वडिलांच्या डोळ्याच्या धारा थांबेना, घराशेजारच्या विहिरीत पाहिलं तर...; नाशकात खळबळ

Missing Youth Body Found in Well : नाशिकच्या येवला तालुक्यातील तांदुळवाडी येथील तुषार राजेंद्र शिंदे (वय २३) दोन दिवसांपासून घरी परतलेला नव्हता. दुर्दैवाने त्याचा मृतदेह घराशेजारच्या विहिरीत आढळून आल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Tandulwadi young man body in well
Tandulwadi young man body in wellSaam Tv News
Published On

नाशिक : नाशिकच्या येवला तालुक्यातील तांदुळवाडी येथील तुषार राजेंद्र शिंदे (वय २३) दोन दिवसांपासून घरी परतलेला नव्हता. त्याचं संपूर्ण कुटूंब सर्वत्र शोध घेत असताना दुर्दैवाने त्याचा मृतदेह घराशेजारच्या विहिरीत आढळून आल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना समजतात पोलिसांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आलं. दरम्यान, तुषारने आत्महत्या केली की यामागे वेगळं कारण आहे? याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

अकोल्यात दोन तरुणांनी आयुष्य संपवलं

दरम्यान, अकोल्यात दोन तरुणांनी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलंय. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या बोर्डी आणि रामापूर गावातील २३ ते २५ वयोगटातील तरुणांनी आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. बोर्डी येथील ऋषिकेश वरणकार या २३ वर्षीय युवकाने त्याच्याच गायवाड्यात गळफास घेतलाय. तर रामापूर येथील २५ वर्षीय गणेश डाफे याने त्याच्याच जुन्या घरात आत्महत्या केली आहे.

Tandulwadi young man body in well
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकावर अग्नितांडव, अचानक आग लागल्यामुळे सर्वच घाबरले, प्रवाशांची पळापळ अन्...|VIDEO

दरम्यान, ऋषिकेशने घरगुती कारणांवरून आत्महत्या केल्याचं बोललं जातंय. तर गणेशच्या आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. या दोन्ही आत्महत्याच्या प्रकरणात अकोट ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू केलाय.

एकंदरीत ऋषिकेश वरणकर हा आपल्या मोठ्या भावाला शेतीच्या कामात हातभार द्यायचा, त्याचा स्वभाव अगदी मनमयाळू आणि प्रेमळ होता. आज सकाळीच ऋषिकेशचा घरातील काही सदस्यांसोबत वाद झाला होता. त्यानंतर तो तणावात होता. याच कारणावरून त्याने घराजवळच असलेल्या गायवाड्यात आत्महत्या केली असावी. अशी प्राथमिक माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. तर गणेश डाफे याच्या आत्महत्येचं मूळ कारण कळू शकलं नाहीये. गणेश याच्या भावाचा दुधाचा व्यवसाय होता, तो भावाला दुधाच्या व्यवसायात मदतीला हातभार देत असायचा. मात्र, या दोघांच्या आत्महत्या मागील खरं कारण काय? याचा तपास अकोट ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.

Tandulwadi young man body in well
Weather Alert : पावसाळ्यातही उन्हाचे चटके; पुढील ५ दिवस काही राज्यांत 'हाय गर्मी', अनेक राज्यांना पावसाचा अलर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com