
पराग ढोबळे, साम प्रतिनिधी
नावडती भाजी केली तर अनेक मुलं जेवण करत नाही. पण आवडत नसलेली भाजी केल्यामुळे थेट घर सोडून जाण्याची घटना तुम्ही कधी ऐकलीय का? नाही ना, पण अशी घटना घडलीय नागपूरमधील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत. आईने घरी नावडती भाजी केल्यानं एका अल्पवयीन मुलगा घर सोडून थेट दिल्लीला गेला होता. परंतु नागपूर पोलिसांच्या शानदार कामगिरीमुळे अल्पवयीन मुलाला शोधण्यात यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सतरा वर्षीय मुलगा आणि त्याची आई कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत वास्तव्यास आहेत. ११ जुलै रोजीच्या रात्री मुलाच्या आईने जेवणासाठी भेंडीची भाजी बनवली. त्या रात्री अल्पवयीन मुलाचं आणि त्याच्या आईचं भेंडीच्या भाजीवरून भांडण झालं. मुलाला भेंडीची भाजी आवडली नसल्यामुळे त्याने खाण्यास नकार दिला. त्यामुळे आई मुलाला रागावली आणि याच रागातून त्याने चक्क घर सोडून दिल्ली गाठली.
घर सोडून निघून जाताना त्याने स्वतः जवळचा मोबाईलही स्विच ऑफ केला होता. त्यामुळे त्याचा शोध लागत नव्हता. कुटुंबीयाने मित्रमंडळी नातेवाईकांकडे शोध घेतला. पण त्या मुलाचा काही थांगपत्ता लागला नाही. अखेर कुटुंबियांनी थकून पोलिसात तक्रार दिली. कोतवाली पोलिसांनी मुलगा अल्पवयीन असल्यामुळे संवेदनशीलता दाखवत तात्काळ शोध मोहीम राबवली. सतरा वर्षीय मुलाने मोबाईल स्विच ऑफ केल्यामुळे त्यासाठी सायबर विभागाने एक युक्ती लढवली आणि लिंक पाठवली.
त्या मुलाने मोबाइल सुरू करताच त्याच्या मोबाईलचे लोकेशन पोलिसांना मिळाले. मुलाचे लोकेशन मिळाल्यानंतर तो मथुराला असल्याचं पोलिसांना कळालं. त्यानंतर तो दिल्लीला गेला आणि तिथील पोलिसांची मदत घेत नागपूर पोलिसांनी त्याला नागपुरात आणण्यात आलं. पोलिसांनी मुलाला सुखरूप घरी आणल्यामुळे कुटु्बियांनी पोलिसांच्या कामाचे कौतुक केलं. आणि त्यांचा सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.