Mumbai Crime: मुंबईच्या डीआरआय विभागाची मोठी कारवाई; ४ कारवाईत ७०कोटींचे अमली पदार्थ जप्त

Mumbai Crime: अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ४ जणांना अटक करण्यात आलीय.
Mumbai Crime
Mumbai Crime Saam Tv
Published On

Mumbai DRI department:

मागील काही दिवसांपासून मुंबईतील विमानतळावर कोकेन तसेच इतर प्रकारचे अमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे प्रकार वाढलेत. या पार्श्वभूमीवर डीआरआयकडून कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी डीआरआय अधिकाऱ्यांनी ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई केली असून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ४ जणांना अटक करण्यात आलीय. (Latest News)

या कारवाईत डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी ७ किलो वजनी कोकेन जप्त केलंय. यात दोन भारतीय दोन विदेश नागरिकांचा समावेश आहे. केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी एकूण चार ठिकाणी केलेल्या कारवाईत ७० कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. मुंबई विमानतळ तसेच मुंबईतील एका घरात ही कारवाई करण्यात आलीय. चार आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नैरोबी येथून कोकेनची तस्करी केली जात होती. मुंबईतील विरार येथे वास्तव्यास असलेल्या व्यक्तीच्या घरातून हे कोकेन जप्त करण्यात आलं. तर इतर प्रकरणांमध्ये प्रवाशांनी आपल्या बॅगेत कप्पे तयार करून त्यात कोकेन लपवलं होतं. तिसऱ्या प्रकरणात एका व्यक्तीने कोकेनच्या कॅप्सूल गिळल्या होत्या. या प्रवाशांची शारीरिक तपासणी केली त्यावेळी त्यांच्या शरीरात कोकेनच्या कॅप्सूल आढळून आल्या. या आरोपीला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

काही दिवसांआधी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर ५६८ ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत अंदाजे ५.६८ कोटी होती. याप्रकरणी तीन परदेशी महिलांना डीआरआयने अटक केली होती. या महिलांवर एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत अटक करण्यात आली.

दोन महिला युगांडा आणि एक टांझानिया देशाची रहिवासी असून सॅनिटरी पॅड आणि गुद्वारातून कोकेनची तस्करी केली जात होती. अमलीपदार्थ लपविण्यासाठी अनेक प्रकारच्या शक्कल लढविल्या जात असतात. त्यातच तस्करीसाठी महिलांचा वापर केला जात आहे. या महिला अमलीपदार्थ गुप्तांग आणि सॅनिटरी पॅडमध्ये लपवून तस्करी करत आहेत. त्यामुळे तपास यंत्रणांसमोरील आव्हाने वाढली आहेत.

आर्थर रोड कारागृहात ड्रग्जची तस्करी

मुंबईतील आर्थर रोड कारागृहात पोलीस हवालदारचं कैद्यांना ड्रग्ज पुरवत होता. या प्रकरणी पोलीस हवालदाराला अटक करण्यात आलीये. विवेक नाईक असं या पोलीस हवालदाराचं नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक नाईक याला कारागृहात ७१ ग्रॅम चरसची तस्करी करत होता त्यावेळी त्याला पकडण्यात आलं. या पोलीस हवालदाराविरोधात एन.एम जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. काही दिवसांपूर्वी पुण्याच्या येरवडा कारागृहात अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे वृत्त समोर आले होते.

Mumbai Crime
Crime News: मुंबई क्राईम ब्रँचकडून सोलापुरातील ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश; १०० कोटी रुपयांचे साहित्य जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com