
सचिन गाड, प्रतिनिधी
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फूड कोर्टात काम करणाऱ्या तीन कर्मचारीच सोने तस्करीची खिचडी करत असल्याची बाब उघडकीस आलीय. महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने तब्बल १० कोटी रुपयांचे सोने जप्त केलंय. याप्रकरणी विमानतळावरील फूड कोर्टात काम करणाऱ्या तिघांसह ६ जणांना अटक करण्यात आलीय. या कारवाईने सोन्याच्या तस्करीत गुंतलेल्या एका मोठ्या सिंडिकेटचा पर्दाफाश झाला आहे.
गेल्या दोन दिवसांत डीआरआय मुंबईने सुमारे ३६ किलो तस्करी केलेले सोने जप्त केले होते. ज्यामुळे तस्करी करणाऱ्या मंडळींना मोठा धक्का बसलाय. विमानतळावर विविध पदांवर काम करणाऱ्या 3 जणांसह 6 जणांच्या अटकेने सोन्याच्या तस्करीत गुंतलेल्या एका मोठ्या सिंडिकेटचा पर्दाफाश झालाय. मिळालेल्या अतिरिक्त माहितीनुसार, महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला सोने तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली. विमानतळावरील फूड कोर्टात काम करणारेच त्यात सहभागी असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती.
विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या एक सिंडिकेट आंतरराष्ट्रीय वाहतूक प्रवाशांकडून सोने मिळवून ते विमानतळाबाहेर पोचविण्याच्या काम करत होती. ही माहिती मिळाल्यानंतर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर पाळत ठेवली. तस्करीच्या सोन्याच्या दोन खेपा विमानतळाबाहेर वितरित केल्या जात असताना अधिकाऱ्यांनी त्यांना अडवलं. त्यानंतर सोन्याची डिलिव्हरी करणाऱ्या विमानतळावरील तीन कर्मचाऱ्यांना आणि तीन रिसिव्हर्सनाही अटक करण्यात आली.
अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत ८ पाउचमध्ये मेणाच्या स्वरूपात सोन्याच्या धुळीचे २४ अंडाकृती आकाराचे गोळे सापडले. तपासणी करताना ९.९५ कोटी रुपयांचे १२.५ किलो (नेट वजन) सोने जप्त करण्यात आले. तर ९.९५ कोटी रुपये किमतीचे मेण स्वरूपात १२.५ किलो सोन्याची धूळ जप्त करण्यात आली होती. सीमा शुल्क कायदा, १९६२ च्या तरतुदींनुसार सर्व ६ जणांना अटक करण्यात आलीय.
मे महिन्यातही मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला होता. मागील तीन दिवसांत तब्बल ७.४४ कोटी रुपये किंमतीचे सोने जप्त करण्यात आले होते. सीमा शुल्क विभागाने ही धडक कारवाई करण्यात आली होती. १८ प्रकरणांत ११.६२ किलो सोने जप्त करण्यात आले होते. त्यात सोन्याचे दागिने, विटा, सोन्याची पूड, सोन्याच्या मेणाचा समावेश आहे. यात परदेशी नागरिकांसह एकूण सात जणांना अटक केली गेली होती. गुदद्वार तसेच अंतर्वस्त्रे, कपडे आणि बुटात लपवून ही तस्करी केली जात होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.