वर्गमित्राच्या खोलीत सापडला ३ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या MBA विद्यार्थिनीचा निर्वस्त्र मृतदेह; व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल

MP Crime News: तीन दिवसांपासून बेपत्ता असलेली एमबीएची विद्यार्थिनी तिच्या वर्गमित्राच्या खोलीत मृतावस्थेत आढळली. तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हॉट्स अप ग्रुपवर व्हायरल करण्यात आला होता.
MP Crime News:
Police officials investigating the room where the missing MBA student’s body was found.saam tv
Published On
Summary
  • तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एमबीए विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला

  • वर्गमित्राच्या खोलीत मृतदेह नग्न अवस्थेत आढळल्याने खळबळ

  • कॉलेजच्या अधिकृत WhatsApp ग्रुपवर आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल

गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एमबीए विद्यार्थिनीचा मृतदेह सापडलाय. या विद्यार्थिनीच्या निर्वस्त्र मृतदेह तिच्या वर्गमित्राच्या खोलीत सापडल्याने मोठी खळबळ उडालीय. धक्कादायक बाब म्हणजे १० फेब्रुवारीच्या रात्री महाविद्यालयाच्या अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपवर विद्यार्थिनीच्या मोबाईल फोनवरून एक आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. तरुणाचा चेहरा इमोजीने लपवण्यात आला होता, तर विद्यार्थिनीचा चेहरा स्पष्ट दिसत होता. ही घटना मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये घडलीय.

MP Crime News:
संतापजनक! धावत्या बसमध्ये महिलेसोबत धक्कादायक कृत्य, नराधम 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात; त्या २४ तासांत नेमकं काय घडलं?

आरोपीने विद्यार्थिनीच्या मोबाईल फोनचा वापर करून तिच्या स्टेटसवर आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड केलेत. हे व्हिडिओ आरोपीने तिच्या संपर्कातील व्यक्तींना पाठवले असा आरोप कुटुंबीयांनी केलाय. द्वारकापुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना अंकल गली येथे घडली. पोलिसांना माहिती मिळताच एफएसएल टीम घटनास्थळी पोहोचली आणि तपास सुरू केला .

MP Crime News:
Beed Crime : बीड पुन्हा हादरलं! मध्यरात्री धाडसी दरोडा, प्रतिकार करणाऱ्यांवर दरोडेखोरांनी केले वार

एमबीए विद्यार्थिनीचा मृतदेह ज्या खोलीत आढळला ती खोली मंदसौर येथील रहिवासी पीयूष धामनोदियाचा होता. ही जागा त्याने भाड्याने घेतली होती. दोघेही सनवेर रोडवरील एका संस्थेत दुसऱ्या सत्रातील एमबीए पदवीचे शिक्षण घेत होते. दरम्यान घटनेपासून पीयूष बेपत्ता आहे. विद्यार्थिनीने सांगितले होते की ती एका वर्गमित्रासह वाढदिवसाच्या पार्टीला जात होती.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार मुलगी १० फेब्रुवारीपासून बेपत्ता होती. घटनेच्यादिवशी ती तिच्या वडिलांसोबत आधार कार्ड दुरुस्त करून घेण्याचा दावा करत घरातून बाहेर पडली होती. तिच्या वडिलांनी तिला जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सोडले. तिथून तिने तिच्या धाकट्या बहिणीला फोन करून सांगितले की ती तिचा वर्गमित्र पियुषसोबत वाढदिवसाच्या पार्टीला जातेय आणि रात्री ११ वाजेपर्यंत परत येईल. बहिणीने तिला स्वतः तिच्या वडिलांना याबद्दल कळवण्यास सांगितले. त्यानंतर, मुलगी घरी परतलीच नाही.

त्याच रात्री कॉलेजच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर तरुणीचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला. यात तरुणाचा चेहरा एका इमोजीने झाकलेला होता. पण तरुणीचा चेहरा स्पष्ट दिसत होता. कॉलेज व्यवस्थापनाने व्हिडिओ काढून टाकला. दुसऱ्या दिवशी ११ फेब्रुवारी रोजी तरुणीच्या वडिलांना फोन केला. त्यांनी स्पष्ट केले की त्यांचे दोन्ही मोबाईल फोन बंद आहेत. त्यानंतर कुटुंब रावजी बाजार पोलीस ठाण्यात गेले. तेथून त्यांना पंढरीनाथ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. रात्री उशिरा बेपत्ता व्यक्तीचा एफआयआर दाखल करण्यात आला.

12 फेब्रुवारी रोज तरुणीचा शोध दिवसभर सुरू राहिला, परंतु कुटुंबाचा आरोप आहे की पोलिसांनी कोणतेही गांभीर्य दाखवले नाही. ते टाळाटाळ करत राहिले. कुटुंबाच्या चिंतेमुळे एक पोलीस कर्मचारी तरुणीच्या वर्गमित्र पीयूषच्या खोलीत गेला. त्या खोली बाहेरूनच कुलूप लावून गेला होता. खोलीतून दुर्गंधी येत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर हे रहस्य उघड झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com